येत्या पाच दिवसात राज्यात ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह गारपीटीची शक्यता
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आज राज्यभरात सोसाट्याच्या वाऱ्यासह, पावसाच्या सरी आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे.असा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह, पावसाच्या सरी आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. राज्यात पावासाचा हा अंदाज शनिवारपर्यंत कालावधीसाठी वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ासाठी हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यापासून प्रतिबंधासाठी तयारीत राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या पावसामुळे शेतीतील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
तसेच नाशिक, छत्रपती संभाजीनगर,अहमदनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव, नाशिक, औरंगाबाद आणि जालन्यात काही ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता आहे.