तुम्ही वापरताय ते खाद्यतेल भेसळयुक्त तर नाही ना? घरीच ओळखा सोपी पद्धत
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आपल्या घरातील नेहमी वापरात असलेला महत्त्वाचा पदार्थ ते म्हणजे खाद्यतेल. पण तुम्ही आणता ते तेल खरंच शुद्ध आहे का? सणासुदीच्या काळात सर्वाधिक मागणी असलेल्या पदार्थांमध्ये भेसळ केल्याची काही प्रकरणं समोर येतात. अगदी याला तेलही अपवाद नाही. पण आता तुम्ही आणलेल्या तेलात नेमकी भेसळ ओळखायची कशी, असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. तर चिंता बिलकुल नको. तुम्ही कधी घरच्या घऱी ही भेसळ ओळखू शकता. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने तेलात ट्राय-ऑर्थो-क्रेसिल-फॉस्फेट (TOCP) भेसळ तपासण्यासाठी तुम्ही घरी करू शकता, यासाठी एक सोपी टेस्ट शेअर केली आहे.
तेलातील भेसळ ओळखण्यासाठी करा या टेस्ट
तेलात भेसळ होणाऱ्या घटकापैकी एक म्हणजे ट्राय-ऑर्थो-क्रेसिल फॉस्फेट. ज्याचा रंग खाद्यतेलासारखा असतो. ते तेलात विरघळते आणि तेलाच्या चवीत फारसा बदल करत नाही.
- तेलातील भेसळ ओळखण्यासाठी तुम्ही वापरत असलेले 2 मिली खाद्यतेल घ्या. त्यात थोडे पिवळे लोणी घाला. भेसळ नसलेल्या तेलामध्ये कोणताही बदल होत नाही. मात्र भेसळयुक्त तेलाचा लगेच बदलतो आणि लाल होतो.
- माहितीनुसार, तेलांमध्ये बऱ्याचदा अर्जिमोन तेल मिसळले जाते. तेलामध्ये याची भेसळ आहे की नाही हे ओळखण्यासाठी थोडे तेल एका टेस्टटयुबमध्ये घेऊन त्यात तेवढचे नायट्रिक ऍसिड टाका आणि हळूहळू ढवळा. याचा रंग लालसर झाल्यास ते तेल भेसळयुक्त आहे हे निश्चित.
- तेलामध्ये अनेकदा मिनरल ऑईलदेखील मिसळले जाते. हे तपासण्यासाठी 2 मिली तेल टेस्टटयूबमध्ये घेऊन त्यात एन-12 अल्कोहोलिक पोटॅश मिसळावे. हे टेस्टटयूब मिश्रण 15 मिनिटे गरम पाण्यात घालून त्यात 10 मिली. पाणी टाकावे. यात मिनरल ऑईल मिसळलेले असेल तर मिश्रण गढूळ दिसते.
- खाद्यतेलामध्ये काहीवेळा एरंडेल तेलदेखील मिसळले जाते. हे ओळखण्यासाठी 1 मिली. तेल घेऊन त्यात 10 मिली ऍसिडीफाईड पेट्रोलियम इथर टाकावे आणि ढवळावे. या टेस्टटयूबमध्ये अमोनियम मॉलिबडेटचे काही थेंब टाकावे. याचा रंग पांढरा गढूळ दिसल्यास समजून जावे की यामध्ये एरंडेल तेलाची भेसळ झालेली आहे.