प्रेमासाठी वाट्टेल ते! मुलांना चॉकलेट, बिस्किट साठी २० रूपये देऊन आई प्रियकरा सोबत फरार
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आपण प्रेमी वीरांचे अनेक प्रकरणे बघितली असतील ,काही प्रेमी प्रेमासाठी वाटेल ते करायला तयार असतात. अशी अनेक प्रेमप्रकरणे याआधी अनेकदा समोर आले आहेत. अशीच एक धक्कादायक विचित्र घटना घडली.तिच्या पोटच्या दोन चिमुकल्यांना सोडून एक विवाहित महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. आपली मुलं, पती आणि संसार सोडून ही महिला प्रियकरासोबत पळून गेल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे या महिलेने मुलांना २० रुपये देऊन दुकानातून चॉकलेट आणि बिस्किट आणून खाऊन घ्या,मी बँकेत पैसे काढायला जाते,असं सांगत दुकानात पाठवलं आणि नंतर प्रियकरासोबत निघून गेली. यात बिचारे मुलं मात्र आई विना पोरके झाले.
मुलं चॉकलेट आणि बिस्किटे घेऊन परतली तेव्हा त्यांची आई घरात नव्हती आणि तिच्यासोबत असणारा तिचा प्रियकरही नव्हता. बिस्किटे खाल्ल्यानंतर मुलांनी आई परत येण्याची वाट पाहिली, पण ती परत आलीच नाही. मुले आईची वाट पाहून पाहून थकली अखेर दोघ मुलं रडायला लागली ,आई पळून गेल्याने मुलांची अवस्था रडून रडून अत्यंत वाईट झाली.
वडील घरी आल्यावर दोघ मुलांनी वडिलांना घडलेला प्रकार सांगितला,की आम्हाला २० रुपये देत, तुम्ही चॉकलेट आणि बिस्किट आणून खाऊन घ्या, मी बँकेत पैसे काढायला जाते, असं आईने सांगितलं. आम्ही चॉकलेट आणि बिस्किटे घेऊन परतली तेव्हा आई घरात नव्हती आणि तिच्यासोबत असणारा तिचा प्रियकरही नव्हता. बिस्किटे खाल्ल्यानंतर आम्ही आई परत येण्याची वाट पाहिली, पण ती परत आलीच नाही. मुलांनी सांगितलेला घडलेला सर्व प्रकार वडिलांनी ऐकताच पत्नी अचानक पळून गेल्याने पतीलाही मोठा धक्का बसला.
पत्नी पळून गेलीये हे लोकांना सांगावं तरी कसं,आणि तिला शोधावं तरी कसं? असा प्रश्न या पतीला पडला . शेवटी त्याने हिंमत करत नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांच्या कडेही तिचा शोध घेतला, परंतु तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पतीने पोलीस ठाण्यात जाऊन एका व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, “मला दोन मुलं आहेत. २४ मे २०२२ रोजी माझ्या पत्नीने मुलांना २० रुपये दिले आणि म्हणाली की तुम्ही दुकानातून चॉकलेट, बिस्किटं आणून खा, मी बँकेतून पैसे घेऊन येत आहे. परंतु, त्यानंतर ती परतली नाही.” याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास केला जात आहे.
ही घटना बिहारमध्ये घडली असून बथवारिया पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेची आहे.