जळगावचे मावळते पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांची मुंबई पोलीस उप-आयुक्त पदी नियुक्ती
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। या पूर्वीच शिंदे -फडणवीस सरकारने राज्यातील ४३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या,उर्वरित अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित होत्या, जळगाव येथून बदली झालेले पोलीस अधीक्षक डॉ मुंडे , बदली झाल्यापासून आपल्या नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते, त्या नुसार जळगाव जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक डॉ,प्रवीण मुंडे यांना मुंबई शहराचे नवीन पोलीस उप-आयुक्त म्हणून नियुक्ती होऊन पदोन्नती मिळाली आहे. तर जळगाव विभागाचे डीवायएसपी कुमार चिंता यांची गडचिरोली येथे अपर पोलीस अधीक्षक पदी बढती झाली आहे. तसेच पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उप-आयुक्त भाग्यश्री नवटके यांची चंद्रपूर राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशकपदी बदली करण्यात आली आहे.
शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य सरकारनं दिवाळीपूर्वीचं पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या होत्या. पोलीस दलातील ४३ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या नंतर आज उर्वरित पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय गृह विभागाकडून जारी करण्यात आला असून त्यात जळगावचे मावळते पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांना मुंबई शहराचे नवीन पोलीस उप-आयुक्त म्हणून तर जळगाव विभागाचे डीवायएसपी कुमार चिंता यांची गडचिरोली येथे अपर पोलीस अधीक्षक पदी बढती देण्यात आली असून यांच्या सोबत राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.