महाराष्ट्र

किरीट सोमय्याच्या नव्या ट्विटने खळबळ,चला…

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या मागच्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे हात धुवून लागले आहेत. अनिल देशमुख, भावना गवळी, संजय राऊत, अनिल परब हे नेते किरीट सोमय्यांच्या रडारवरती आहेत. किरीट सोमय्या सतत पत्रकार परिषद घेवून आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत.

काही दिवसांपूर्वी नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीच्या १२ नेत्यांची नावे जाहीर केली होती. यातील दोन नेते तुरुंगात असल्याचे सांगत उर्वरित १० नेते तुरुंगात जाण्यासाठी रांगेत उभे असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर बरेच दिवस शांत राहिल्यानंतर आज किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केले असून त्यांच्या या ट्विटने खळबळ उडाली आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विट केले आहे की, ‘चला दापोली, २६ मार्चला अनिल परबांचे रिसॉर्ट तोडूया,’ असे सोमय्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे सोमय्या २६ मार्चला दापोलीला जाणार असल्याचे निश्चित झाले असून गेल्या अनेक महिन्यांपासून सोमय्या सातत्याने अनिल परबांवर आरोप करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!