भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

आज लक्ष्मी पूजन, शुभ मुहूर्त, पूजन साहित्य, पूजा विधी, सविस्तर जाणून घ्या.

मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आश्विन कृष्ण पक्षातील चतुर्दशीला लक्ष्मीपूजन साजरे केले जाते. यंदा हा सण १२ नोव्हेंबरला म्हणजेच आज साजरा केला जाणार आहे.

दिवाळी हा सण आनंदाचा, उत्साहाचा, प्रकाशाचा आणि दिव्यांचा सण. हिंदू धर्मात दिवाळीला खास महत्त्व आहे. दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जाणारा सण.

कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळीचा उत्साह साजरा करण्यात येतो. यंदा लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी एकाच दिवशी आहे. कार्तिक अमावस्या तिथी १२ नोव्हेंबर २०२३ला दुपारी २:४४ वाजता ते १३ नोव्हेंबर २०२३ ला दुपारी २:५६ वाजेपर्यंत असणार आहे. हिंदू धर्मातील उदय तिथीनुसार १२ नोव्हेंबर २०२३ दिवाळी असून या दिवशी लक्ष्मीपूजन करण्यात येत आहे.

आश्विन कृष्ण पक्षातील चतुर्दशीला लक्ष्मीपूजन साजरे केले जाते. यंदा हा सण १२ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्रीगणेशाची विशेष पूजा केली जाते. या पूजेसाठी लागणारे साहित्य कोणते जाणून घेऊया.

१. दिवाळी पूजा साहित्य
दिवाळीत (Diwali) पूजा करताना चौरंग, लाल वस्त्र, लक्ष्मी-गणेशाची मूर्ती, हळदी, कुंकू, गंध, सुपारी, लवंग, अगरबत्ती, दिवा, तूप, गंगाजल, पंचामृत, फुले, फळे , कापूर, कापूस, गहू, दुर्वा, बत्ताशे, चांदीची नाणी, कलश, नारळ, देठाची पाने आदी साहित्य असावे.

२. लक्ष्मी पूजनाची योग्य वेळ
दिवाळीचा प्रदोष काळ संध्याकाळी ०५.२९ ते ०८.०८ पर्यंत, वृषभ काळ संध्याकाळी ०५.३९ ते ०७.३५ पर्यंत आणि रात्री ११. ३९ ते १२. ३२ पर्यंत आहे. दिवाळीच्या दिवशी या शुभ मुहूर्तावर पूजा करणे शुभ मानले जाते.

दिवाळी लक्ष्मीपूजन पद्धत
देवी लक्ष्मींची स्थापना
सर्वप्रथम आसनावर लाल कपडा परिधान करा. त्यानंतर मूठभर तांदूळ ठेवा त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करा.

कलशाची स्थापना
आता एका बाजूला तांदूळ घाला त्यावर कलश स्थापन करा. कलश हे तांबं, पितळं किंवा चांदीचा असू शकतो. 3/4 भांडे पाण्याने भरा आणि त्यात झेंडूची फुलं आणि तांदळाचं काही दाण्यासोबत एक नाणं, 1 अख्खी सुपारी टाका. कलशाच्या तोंडावर आंब्याची किंवा विड्याची पाच पानं ठेवा.

लक्ष्मी-गणेशाची मूर्ती
लक्ष्मीजींची पूजा करताना लक्ष्मी-गणेशजींची मूर्ती किंवा चित्र पूजेच्या मध्यभागी स्थापन करा. लक्षात ठेवा की मूर्ती कलशाच्या नैऋत्य दिशेला असावं. यानंतर आरतीचं छोटं ताट देवी लक्ष्मीसमोर ठेवा, तांदळावर हळद लावून कमळाचं फूल नक्की ठेवा. तुम्ही नाणी, नोटा, सोन्याची नाणी, दागिनं इत्यादीच्या गोष्टी ठेवा.

लक्ष्मीपूजा मंत्र आणि इंद्रपूजा मंत्र
लक्ष्मीपूजा मंत्र – नमस्ते सर्वदेवानां वरदाऽसि हरिप्रिये । या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।। धनदायै नमस्तुभ्यं निधिपद्माधिपे शुभे । भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादि संपदः ।।

इंद्रपूजा मंत्र – ऐरावत समारूढो वज्रहस्तोमहाबलः । शतयज्ञाभिधो देवस्तस्मादिन्द्राय ते नमः ।।

‘हे’ नैवेद्य दाखवा
लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मखाणा, बत्तासे, हलवा, खीर, डाळिंब आणि सुपारी अर्पण नक्की करा. श्रीगणेशाला पिवळ्या रंगाची मिठाई अवश्य अर्पण करा.

दिवाळीत श्रीगणेश- देवी लक्ष्मीची मूर्ती कशी असावी?
दिवाळीत देवी लक्ष्मी आणि श्रीगणेशाची मूर्ती तुटणार नाही याची काळजी घ्यावी.

या काळात आपण लक्ष्मी देवीचा फोटो देखील वापरु शकतो.

दिवाळीच्या दिवशी दरात रांगोळी काढा, दिवे लावा आणि लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी पूजा करा.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!