भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीयराष्ट्रीय

जगतगुरु रामभद्राचार्य यांची लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी भविष्यवाणी, भाजपला किती जागा मिळतील?

मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पुढील आढवड्यभरात लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरु झाली आहे. भाजप आणि काँग्रेसने आपली पहिली यादीही जाहीर केली आहे. या लोकसभा निवडणुकी संदर्भात काही संस्थांचे ओपिनियम पोल आले आहेत. जगद्गुरु रामभद्राचार्य यांना नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भविष्यवाणी केली आहे.

जगद्गुरु रामभद्राचार्य काय म्हणाले
ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर शुक्रवार रोजी जगद्गुरु रामभद्राचार्य मैहर वाली शारदा देवीच्या मंदिरात पोहचले.तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता त्यांना लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार? हा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी भाजप ला ३७० पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा दावाब केला. तसेच राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा कोणताही परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीवर होणार नाही?, असे त्यांनी म्हटले. ३ नोव्हेंबर २०२३ रोजी जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे भविष्य वर्तवले होते.

राम मंदिर पूर्ण झाल्याचा आनंद
जगद्गुरु रामभद्राचार्य राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सनातन धर्माला विरोध करणारे लोक राम मंदिर झाल्याबद्दल दु:खी आहे. राम मंदिरात रामलल्लाचे विराजमान होणे, हे कोट्यवधी भाविकांचे स्पप्न होते. यामुळे सर्वच भारतीय आनंदीत झाले आहे.


कोण आहेत रामभ्रदाचार्य
रामभद्राचार्य यांचा जन्म १९५० मध्ये जौनपूर येथील खांदीखुर्द गावात झाला. चित्रकूटमध्ये राहणारे रामभद्राचार्य प्रख्यात विद्वान, रचनाकार, प्रवचनकार आहेत. रामानन्द सम्प्रदायामधील सध्याच्या चार जगद्‌गुरुपैंकी एक ते आहे. १९८८ पासून ते या पदावर आहे. ते चित्रकूटमध्ये असणाऱ्या संत तुलसीदास सामाजिक सेवा संस्थानचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!