भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

ब्रेकिंग : महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची यादी, कुणाला मिळणार नारळ?

मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लोकसभा निवडणुकीचे पडधाम वाजायला लागले आहे,लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. या निवडणुकीला कुणाकुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसभेच्या ४८ जागांवर कुणाकुणाला उमेदवारी द्यावी, यासाठी प्रत्येक पक्षांच्या गोटात जोरदार खलबतं सुरू आहेत. . सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची आता जागावाटपाबाबत होत असलेली चर्चा आता अंतिम टप्प्यावर आली आहे. महाविकास आघाडीच्या गोटात घडणाऱ्या घडामोडींची सातत्याने बाहेर येत आहेत. असं असलं तरी भाजपप्रणित एनडीएने इंडिया आघाडीच्या आधी बाजी मारत लोकसभेच्या देशातील १९५ उमेदवारांची यादी जाहीर केलीय. पण यामध्ये महाराष्ट्राच्या जागांचा समावेश नाही. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीतून कुणाला कोणत्या जागेवरुन संधी मिळणार? हा प्रश्न गुलदस्त्यात होता. पण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची यादी बाहेर आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मंगळवार रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाहांच्या उपस्थितीत महायुतीच्या जागा वाटपावर आज अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं. मात्र बऱ्याच ठिकाणी महायुतीतल्या तीनही पक्षांचे उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.सध्याच्या स्थितीत भाजपनं २३ जागांवर निरीक्षकांची नियुक्ती करुन विद्यमान खासदारांच्या २३ जागा लढणारच, असे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं २२ जागांची मागणी केलीय. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची १०-१२ जागांची मागणी आहे.

महायुतीतल्या संभाव्य उमेदवारांची भाजपची यादी
उत्तर मुंबई – विनोद तावडे किंवा पियूष गोयल
ईशान्य मुंबई मनोज कोटक
उत्तर मध्य मुंबई- पूनम महाजनांच्या नावाची शक्यता आहे
बीड – पंकजा मुंडे
सातारा – उदयनराजेंच्या नावाची शक्यता आहे
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार किंवा अशोक जीवतोडे
छत्रपती संभाजीनगर – भागवत कराड किंवा अतुल सावे
पुणे – मुरलीधर मोहोळ
धुळे- प्रदीप दिघावकर
नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर
जालना – रावसाहेब दानवे
अकोला – संजय धोत्रे
नागपूर – नितीन गडकरी
नंदूरबार – विजयकुमार गावित किंवा हिना गावित
पालघरमधून राजेंद्र गावितांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे
रावेर – रक्षा खडसे किंवा केतकी पाटील
शिर्डी – रामदास आठवलेंना भाजप तिकीट देऊ शकते
सोलापूर – अमर साबळे
भंडारा गोंदिया – सुनिल मेंढे
गडचिरोली – चिमुर अशोक नेते
भिवंडी – कपिल पाटील
सांगली – संजय काका पाटील
दिंडोरी – डॉ. भारती पवार
धाराशीव – बसवराज पाटील किंवा बसवराज मंगरुळे
अमरावती – नवनीत राणा भाजपकडून लढू शकतात
अहमदनगर – सुजय विखे पाटील

शिंदेंच्या शिवसेनेचेही काही उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे
दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
मावळ- श्रीरंग बारणे
वाशिम-यवतमाळ – संजय राठोड
नाशिक – हेमंत गोडसे
बुलडाणा – प्रतापराव जाधव
हातकणंगले – धैर्यशील माने
हिंगोली – हेमंत पाटलांची शक्यता आहे
वर्धा – रामदास तडस
रामटेक – कृपाल तुमानेंच्या नावाची शक्यता आहे


कोणत्या जागांवर तिढा?
काही जागा अशा आहे की जिथं एकाच जागेवर मित्रपक्षांचाच दावा आहे, ज्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग शिंदेंच्या शिवसेनेचे किरण सामंत किंवा भाजपकडून नारायण राणेंना मिळू शकते. माढ्यातून भाजपकडून रणजीत निंबाळकर किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर उभे राहू शकतात. रायगडमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे किंवा भाजपकडून धैर्यशील पाटील यांना उमेदवारी मिळू शकते. तर बारामतीत अजित पवारांचीच्याच पत्नीचं नाव निश्चितच आहे. सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित असून नणंद भावजय असा सामना होईल. काही जागांवर तिन्ही पक्षांकडून उमेदवारांची निश्चिती झालेली नाही. मात्र अंतिम जागा वाटप झाल्यावर पुढच्या ३-४ दिवसांत आणखी चित्र स्पष्ट होईल

अमित शाह काढणार तोडगा

महायुतीत जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. महायुतीत भाजपने ३० ते ३२ जागा लढवाव्यात, असे केंद्रीय नेत्यांचे मत आहे. परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जास्त जागा मागितल्या गेल्या आहेत. त्यामुळे भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे. आता मित्रपक्षांची मागणी कमी करुन भाजप ३० जागा आणि उर्वरित मित्रपक्ष १८ जागा लढवण्याचा तोडगा काढण्याचा प्रयत्न अमित शाह करणार आहे. त्यासाठी अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!