विरोधी पक्ष नेते पदी अजित पवार, सभापतींची घोषणा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण? असा प्रश्न विचारला जात होता. अशावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता विरोधी पक्षनेते असणार आहेत. तशी घोषणा सभापतींनी केलीय.
विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कुणाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जाणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, अखेर अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.