भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

राज्यात मराठा आरक्षण कायदा लागू, शासन निर्णयासह राजपत्र जारी

मुंबई,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क/  राज्य सराकरने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. २६ फेब्रुवारीपासून राज्यात आरक्षण लागू होणार. याबाबत शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आले आहे. मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यात वाद चिघळला होता. जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर सरकार देखील मनोज जरांगे यांच्यावर आक्रमक झाले होते. यापूर्वी विधिमंडळाने मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केले होते. त्यावर कायदा आणि न्यायपालिका विभागाचे सचिव सतीश वाघोले यांनीन सही केली असून त्यामुळे विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले.

SEBC या गटामध्ये मराठा आरक्षण देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सचिव सतीश वाघोले यांनी मराठा आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर राज्य सरकारने राजपत्र जाहीर केले आहे. दरम्यान आज राज्यात कायदा लागू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!