भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यात आजही पाऊस,काही भागात वीजांच्या कडकडाटासह पाऊस व गारपीट

मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क/ राज्यात गेल्या चार दिवसांपासून अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या. तर काही भागात ढगाळ वातावरणही आहे. गारपीटीने पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर हवामान विभागाने राज्यातील पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि बहुतांश जिल्ह्यांतमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात अनेक भागात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. नाशिक, धूळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील काही भागात वीजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे.विदर्भातही पावसाची शक्यता असून बुलडाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर तर मराठवाड्यात बीड, परभणी, हिंगोलीत हलक्या पावसाच्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. मध्य महाराष्ट्रात अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकणातही पावसाची शक्यता असून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शनिवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड तर विदर्भात अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियात आणि खानदेशातील जळगाव, धुळे जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. कोकणात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या ठिकाणी तर नंदूरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, वाशी, यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

उत्तराखंड, हिमाचलमध्ये बर्फवृष्टी
दरम्यान, सकाळपासून उत्तराखंड आणि हिमाचलच्या उंच भागात बर्फवृष्टी झाली आहे. मैदानी भागात पाऊस झाला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात थंडीने पुन्हा दार ठोठावले आहे. हिमाचलमध्ये चार राष्ट्रीय महामार्गांसह 241 हून अधिक रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. रोहतांग, लाहेल-स्पिती, अटल बोगद्याच्या आसपास, चंबाच्या पांगी-भरमौर, किन्नौरमध्ये बर्फवृष्टी झाली आहे, तर कांगडा, शिमला, सोलन, चंबासह अनेक भागात पाऊस सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!