मोठी बातमी ; वीजटंचाईमुळे राज्यात अखेर लोडशेडिंग – ऊर्जामंत्री नितीन राऊत
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात कोळशाच्या तुटवड्यामुळे लोडशेडिंग करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु राज्यात गेल्या ४ ते ५ दिवसांत लोडशेडिंग करण्यात आली नाही अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यात आणि देशात वीज टंचाई असल्यामुळे आता अखेर लोडशेडिंग करण्यात येणार असल्याचा इशारा नितीन राऊत यांनी दिली आहे. तसेच नागरिकांनी त्रास सहन करुन राज्य सरकारला सहकार्य करावे असे आवाहन नितीन राऊत यांनी केलं आहे. वीज टंचाई दूर झाल्यास वीज सुरळीत करण्यात येईल असे नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. तोपर्यंत राज्यात भारनियमन करण्यात येणार आहे.
माध्यमांशी बोलताना राज्यात लोडशेडिंग होणार असल्याची माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली . कोळसा खाणीतील आंदोलन, इंधनाचे दर वाढले असल्यामुळे कोळसा तुटवडा निर्माण झाली, कोळसा रेल्वेपर्यंत पोहचवण्यात तफावत झाली होती. केंद्रीय कोळसा मंत्रालयानेसुद्धा रेल्वे मंत्रालयाकडे बोट दाखवले असल्याचे सगळ्यांना माहिती आहे. रेल्वे आम्हाला रॅक्स देत नाही तर आम्ही कशा प्रकारे कोळसा पुरवठा करु या ज्या केंद्राच्या नियोजनातील चुका आहेत. त्यामध्ये विजेची टंचाई निर्माण झाली असताना महाराष्ट्रामध्ये लोडशेडिंग होऊ देणार नाही असे म्हटलं होते. पण अचानकपणे अदानी पॉवर कंपनीने त्यांचा तिरोडा प्लांटमधील पुरवठा बंद केला आहे. ३१०० मेगा व्हॅटचा करार आहे. परंतु त्यांनी १७६५ मेगा व्हॅटचा पुरवठा केला त्यामुळे १४००५ मेगा व्हॅटची कमतरता निर्माण झाली.
जेएसडब्लूकडून १०० मेगा व्हॅटची वीज मिळत होती तीसुद्धा प्लांट बंद झाला असल्यामुळे मिळाली नाही. सीजीपीएलसोबत जो करार केला आहे. त्यांच्याकडून कराराप्रमाणे ७६० मेगा व्हॅट द्यायचा होता परंतु त्यांनी ७३० मेगा व्हॅट दिला आहे. त्यामुळे १३० बॅकलॉग राहिला त्यातून जो शॉर्टेज झाले असल्यामुळे राज्यात भारनियमण करण्यात आले आहे. ते भारनियमन कधी सुरळीत करण्यात येईल काही सांगता येत नाही. कारण खुल्या बाजारात वीज उपलब्ध नाही आहे. अनेक वीज कंपन्या आहेत ते बंद आहेत. अशा वेळी हा त्राण राहणार आहे. राज्यातील नागरिकांनी विजेच्या वापरात काटकसर करावी असे नितीन राऊत म्हणाले. विजेचे जे भारनियमन आहे त्याचे शेड्यूल वृत्तपत्रातून पब्लिश करु तसेच मेसेज करुन कळवू तेवढा वेळ आम्हाला सहकार्य करा. जर वीज सुरळीत झाली तर भारनियमन बंद करण्यात येईल. अशी परिस्थिती तुर्तास नाही त्यामुळे राज्यात भारनियमन होणार आहे.
लोडशेडिंग कुठे होणार
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लोडशेडिंग करण्याबाबत माहिती देणार असल्याचे सांगितले आहे. वीज ग्राहकांना वृत्तपत्र आणि मोबाईलवर मेसेजद्वारे लोडशेडिंगचा वेळ सांगण्यात येणार आहे. तसेच ज्या भागात वीज विभागाची वसूली होती नाही, ज्या भागात विजेची चोरी होते त्या ठिकाणी लोडशेडिंग होणार आहे. लोकांनी चोऱ्या थांबवाव्यात चोऱ्या होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. भारनियमन होणार नाही यासाठी सहकार्य करा असे नितीन राऊत म्हणाले आहेत.