मोठी बातमी ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय? निवडणूक आयोगाकडून हालचालींना वेग
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगानं राजपत्र जारी केले आहे. विधानसभा निवडणुकांसाठी असलेल्या मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार करण्याबाबत हे राजपत्र आहे. या राजपत्रात निवडणुका या सप्टेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान होणार असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC reservation) होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा निकाल रखडला आहे. हा निकाल या दरम्यान लागून लगेच निवडणुका लागतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र हा निकाल तोवर लागला नाही तर सरकार ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याची शक्यता अधिक आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. याबाबत निवडणूक आयोगाच्या राजपत्रात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील ११ महापालिकांची मुदत गेल्या वर्षी १५ मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. कारण मतदार यादीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आदेश जारी केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्या या १ जुलै २०२३ पर्यंत अस्तित्वात असलेल्या निवडणुकीसाठी वापरण्यात येतील असे सूचित केले आहे. याबाबतचा अध्यादेश काढला आहे. यात असेही म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सप्टेंबर २०२३ ते ऑक्टोर २०२३ या कालावधीत होणार आहेत, असे म्हटले आहे. त्यामुळे राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे बिगुल सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये वाजण्याची शक्यता आहे.
राज्यातील या महापालिकांचे बिगुल वाजणार
बृहन्मुंबई महानगरपालिका
नवी मुंबई महानगरपालिका
पनवेल महानगरपालिका
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पुणे महानगरपालिका
ठाणे महानगरपालिका
उल्हासनगर महानगरपालिका
वसई-विरार महानगरपालिका
अहमदनगर महानगरपालिका, महाराष्ट्र
अमरावती महानगरपालिका
औरंगाबाद महानगरपालिका
भिवंडी-निजामपूर महानगरपालिका
चंद्रपूर महानगरपालिका
जळगाव महानगरपालिका
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
कोल्हापूर महानगरपालिका
मीरा भाईंदर महानगरपालिका
नागपूर महानगरपालिका
नांदेड-वाघाळा महानगरपालिका
नाशिक महानगरपालिका
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
सोलापूर महानगरपालिका