राज्याच्या आजच्या अर्थसंकल्पात प्रमुख दहा घोषणा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क/आज विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये चार महिन्यांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच राज्याला आठ हजार कोटींचा जीएसटी परतावा मिळाल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.
अर्थसंकल्पातील प्रमुख दहा घोषणा
राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न
जुन्नरमध्ये शिवसंग्राहालय उभारणार
राज्यात गुंतवणूक वाढवण्यावर भर
अटल सेतू – कोस्टल रोड जोडण्यासाठी दोन बोगद्यांची निर्मिती
सोलापूर-तुळजापूर- धाराशिव रेल्वे मार्गासाठी भूसंपान सुरू
मुर्तीजापूर -यवतमाळ रेल्वेमार्गाच्या विस्तारीकरणासाठी पन्नस टक्के निधी
छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी पाचशे कोटींचा निधी
राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निवारण उपाययोजना सुरू
नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी शंभर कोटींची तरतुद
राज्यात 200 सिंचन प्रकल्पाची कामं सुरू
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा