भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्रसामाजिक

LPG Cylinder : केंद्र सरकारचं ‘दिवाळी गिफ्ट’ एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त होणार?

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना केंद्र सरकारडून मोठी भेट मिळू शकते. सणासुदीच्या काळात एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे केंद्र सरकार सर्वसामान्यांना दिवाळीचं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. गेल्या दोन वर्षामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एलपीजी सिंलेडरच्या दरात कपात करण्यासाठी केंद्र सरकार अतिरिक्त सबसिडी लागू करण्याच्या तयारीत आहे. यासाठी केंद्र सरकार २५,००० ते ३०,००० कोटी रुपये खर्च करु शकते. दरम्यान, ही रक्कम अंदाजे वर्तवण्यात येत आहे. यासाठी लवकरच केंद्र सरकारपाऊल उचलण्याची शक्यता आहे.

गेल्या काही काळात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात २४४ रुपयांची वाढ झाली आहे. तर मागील दोन वर्षांच्या काळात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याआधी जुलै महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. सध्या दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १,९५३ रुपये आणि सबसिडी असणाऱ्या गॅस सिलेंडरची किंमत ८५३ रुपये आहे. तर मुंबईमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत १,०५२ रुपये आहे.

अतिरिक्त सबसिडी देण्याबाबत गांभीर्याने विचार सुरु
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून एलपीजी गॅससाठी अतिरिक्त अनुदान देण्यावर गांभीर्याने विचार सुरू आहे. अतिरिक्त अनुदान केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेसाठी अर्थसंकल्पात आधीच दिलेल्या अनुदानापेक्षा वेगळं असेल. अलीकडेच सरकारी तेल कंपन्यांनी १९.२ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ९१.५० रुपयांनी कमी केली होती. त्यानंतर दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरचा दर १,९७६ रुपयांवरून १,८८५ रुपयांवर आला आहे.

ऑगस्ट महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात
ऑगस्ट महिन्यात व्यावसायिक LPG सिलिंडरच्या (१९ किलो) किमती कमी झाल्यामुळे LPG सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला होता. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली होती. यानंतर मुंबई आणि दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत ३६ रुपयांनी कमी झाली. तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये सिंलेंडर ३६.५० रुपयांनी स्वस्त झाला.

दरवाढीचं कारण काय?
रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत तेल आणि गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ज्याचा थेट परिणाम देशातील एलपीजीच्या किंमतीवर होताना दिसत आहे. गेल्या दोन वर्षांत एलपीजीच्या किमती २८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. दुसरीकडे, गॅसच्या किमतींचा आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेल्या सौदी सीपीने या कालावधित ३०० टक्क्यांनी झेप घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!