भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीय

LPG gas ; एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सरकारी तेल मार्केटिंग कंपनीकडून (OMCs) एलपीजी गॅस सिलिंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार व्यवसायिक सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.नव्या दरानुसार 19 किलोग्रॅम व्यवसायिक सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर 136 रुपयांनी कमी झाले आहेत. आता राजधानी दिल्लीमध्ये व्यवसायिक सिलिंडरचा दर 2,354 रुपयांऐवजी 2219 रुपये एवढा झाला आहे. मात्र दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या  दरात कोणताही बदल करण्यात आला नसून गॅस सिलिंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली होती. व्यवसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आल्याने हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून व्यवसायिक सिलिंडरच्या दरात वाढ सुरू होती. मात्र जूनच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे.

व्यवसायिक सिलिंडरच्या दरात जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठी कपात करण्यात आली आहे. 19 किलोचा व्यवसायिक सिलिंडर 136 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र दुसरीकडे घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती सिलिंडरचे दर स्थिर आहेत. गेल्या महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दरात दोनदा दरवाढ करण्यात आली होती. सात मे रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. तर 19 मे रोजी पुन्हा एकदा 3.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आज घरगुती सिंलिंडरचे दर देखील स्वस्त होतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या चौदा महिन्यांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 190 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढतच असल्याने गृहिणींचे किचन बजेट बिघडले आहे.

गेल्या महिन्यात देखील व्यवसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ पहायाला मिळाली होती. व्यवसायिक सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ सुरूच  होती. गेल्या महिन्यात देखील व्यवसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ पहायाला मिळाली होती. व्यवसायिक सिलिंडर तब्बल 250 रुपयांनी महाग झाला होता. व्यवसायिक सिलिंडरमध्ये दरवाढ सुरूच असल्याने त्याचा मोठा फटका हा हॉटेल व्यवसायिकांना बसत होता. मात्र आज व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 136 रुपयांची कपात करण्यात आल्याने हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. व्यावसायिक सिलिंडर तब्बल 250 रुपयांनी महाग झाला होता. व्यवसायिक सिलिंडरमध्ये दरवाढ सुरूच असल्याने त्याचा मोठा फटका हा हॉटेल व्यवसायिकांना बसत होता. मात्र आज व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 136 रुपयांची कपात करण्यात आल्याने हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!