LPG Gas : घरगुती गॅस सिलेंडर बाबत सरकारचा मोठा निर्णय!
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। घरगुती म्हणजेच एलपीजी सिलेंडर बाबत सरकारने एक नवी अपडेट जाहीर केली आहे. आता घरगुती सिलेंडरवर QR Code असणार. येत्या तीन महिन्यात क्यूआर कोड असलेले घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर देशभरात उपलब्ध होणार.
अनेकदा एलपीजी गॅस सिलेंडरबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात ज्याची उत्तरे कुठेच मिळत नाही पण आता या QR Codeच्या मदतीने या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहे. चला तर जाणून घ्या याचे फायदे आणि हे कसं काम करणार..
स्मार्टफोनवरुन तुम्ही हा QR कोड स्कॅन करुन तुमच्या प्रश्नांची विस्तृत माहिती जाणून घेणार आहात. हा कोड सिलेंडरच्या आधारकार्डसारखे काम करणार.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी म्हणाले की यामुळे घरगुती सिलेंडरला रेगुलेट करण्यास मिळेल. पुरी पुढे म्हणाले की हा एक मोठा बदल असेल. कारण आता ग्राहक एलपीजी सिलेंडरला ट्रॅक करू शकणार.
असं वापरा सिलेंडरवरील QR कोड
●सुरवातीला स्मार्टफोनवरुन सिलेंडरवरील क्यूआर कोड स्कॅन करा.
●स्कॅन केल्यानंतर स्क्रीनवर डिस्प्ले दिसेल, ज्याद्वारे तुम्हाला माहिती मिळेल की या सिलेंडरला कोणत्या प्लांटवर भरण्यात आले आहेत.
●स्क्रिनवर हे पण दाखवले जाईल की सिलेंडरचा डिस्ट्रीब्यूटर कोण आहे?
●सिलेंडर केव्हा कुठून निघाले आणि याचा डिलिव्हरी बॉय कोण होता, याविषयी ग्राहकाला सविस्तर माहिती मिळेल.
●तुम्ही स्क्रिनवर प्लांटपासून तुमच्या घरापर्यंत सिलेंडर कसे पोहचले, याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार.
●याशिवाय तुम्ही स्क्रीनवर गॅस सिलेंडरची पुर्ण माहिती, जसे की वजन, एक्सपायरी डेट सुद्धा पाहू शकता.
सिलेंडरवरील QR कोडचे फायदे
●QR कोडच्या मदतीने ग्राहक सिलेंडरचे वजन, एक्सपायरी डेटसारखी डिटेल्स माहितीही मिळवू शकतो.
●क्यूआर कोडच्या मदतीने ग्राहक सिलेंडर कुठे भरण्यात आले, याविषयी माहिती मिळू शकतो.
●गॅस सिलेंडरवरील क्यूआर कोडच्या मदतीने तुम्ही ग्राहकाचे सिलेंडरचं लोकेशनची माहिती मिळवू शकता.
●क्यूआर कोडच्या मदतीने ग्राहक सिलेंडर कुठे भरण्यात आले, याविषयी माहिती मिळू शकतो.
●गॅस सिलेंडर तुमच्या घरी पोहचल्यानंतर ग्राहकांना गॅस सिलेंडरची सेफ्टी टेस्ट झाली की नाही, याविषयी माहिती मिळणार.
●मागील दिवसांमध्ये गॅस सिलेंडर जमा करुन ठेवण्याचे प्रमाण वाढले आहेत. ग्राहक क्यूआर कोडच्या मदतीने गॅस सिलेंडरची चोरी आणि जमा करण्याचं प्रमाण थांबवण्यास मदत मिळू शकते.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा