राज्यावर लम्पीच सावट! जनावरांसाठी करावं लागणार ‘लॉकडाऊन’ ?
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात ४ ऑगस्ट २०२२ रोजी जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदा लम्पी चर्मरोगाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. त्यानंतर १४ सप्टेंबपर्यंत राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये ह्या आजाराची लागण झाल्याची उदाहरणं समोर आली.
राज्यात लम्पी आजाराचा विळखा आणखी घट्ट होताना दिसून येत आहे. मागच्या २४ तासात २० जनावरांना लम्पी रोगाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आधीच पावसानं पिकांचं नुकसानं आणि लम्पीमुळे जनावरं जागेवर असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.
प्रशासनाने जनावर लसीकरणावर भर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून पुढे येत आहे. सोबतच लंपीचा वाढता प्रकोप बघता नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे सावट पाहायला मिळत आहे.
या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शसानाच्या प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ मधील तरतुदीनुसार संपूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी तशी अधिसूचना जारी केली आहे.
काय आहेत लक्षणं?
जनावारांच्या अंगावर फोड येतात. त्यांना ताप येतो. १ ते १३ आठवड्यांपर्यंत हा आजार जनावरांमध्ये राहातो. याची सौम्य ते तीव्र लक्षणं दिसू शकतात. हा आजार संसर्गजन्य असल्याने एकाकडून दुसऱ्या जनावरांमध्ये अगदी सहज संसर्ग होतो.
प्राण्यांच्या डोळ्यातून आणि नाकातून पाणी येते. त्यांना ताप येतो. खाणं पाणी प्राणी सोडतात. अंगावर गाठीसारखे फोड येतात. त्यांना ताप येतो. डोळ्यांची दृष्टी बाधित होण्याची शक्यता असते. अंगाला सूज येते.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा