आज चंद्रग्रहण! शुभ की अशुभ, कसे होते चंद्रग्रहण, कुठे-कुठे दिसणार, कसे पाहू शकता, सुतक काळ जाणून घ्या
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। ग्राहणाचे ज्योतिष आणि धर्मात विशेष महत्त्व आहे. २०२३ वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण २८-२९ ऑक्टोबरच्या रात्री ०१:०५ पासून सुरू होईल आणि ०२:२३ पर्यंत चालेल. या दिवशी कोजागिरी पौर्णिमा देखील आहे. हे खग्रास चंद्रग्रहण आहे, धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहण शुभ मानले जात नाही. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतातही दिसणार आहे. हे चंद्रग्रहण मेष राशीत होणार आहे.
कसे होते चंद्रग्रहण?
चंद्रग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, चंद्राला त्याच्या सावलीने झाकते, त्यानंतर चंद्राचा काही भाग अदृश्य होतो. म्हणजेच सावलीमुळे चंद्राचा हा भाग स्पष्टपणे दिसत नाही, या खगोलीय घटनेला चंद्रग्रहण म्हणतात. चंद्रग्रहणांचे तीन प्रकार आहेत – पूर्ण, आंशिक आणि उपच्छाया चंद्रग्रहण. आज होणारे ग्रहण हे आंशिक चंद्रग्रहण असेल.
कुठे-कुठे दिसणार चंद्रग्रहण
हे चंद्रग्रहण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होईल. आज रात्री उशिरा होणारे चंद्रग्रहण भारतातही दिसणार आहे. याशिवाय हे चंद्रग्रहण नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान, इंडोनेशिया, फ्रान्स, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, हिंद महासागर, प्रशांत महासागर आणि इतर ठिकाणीही दिसणार आहे.
भारतात मध्यरात्रीनंतर दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद, सूरत, जयपूर, कानपूर, लखनौ, नागपूर, कोईम्बतूर, नाशिक, रायपूर, भोपाळ, जोधपूर, प्रयागराज, डेहराडून आणि पाटणा यासह भारतातील इतर भागात चंद्रग्रहण स्पस्टपणे दिसेल.
कसे पाहाल चंद्रग्रहण?
चंद्रग्रहण पाहण्यासाठी विविध प्रकारच्या खगोलीय दुर्बिणींचा वापर केला जातो. चंद्रग्रहण पाहण्याने कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत. उघड्या डोळ्यांनीही ते पाहता येते. विज्ञानानुसार चंद्रग्रहण पाहिल्याने डोळ्यांवर कोणताही परिणाम होत नाही. चंद्रग्रहणाचे थेट प्रक्षेपण अनेक ठिकाणी दुर्बिणीद्वारे लोकांना दाखवले जाणार आहे.
चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी
आज होणारे हे ग्रहण भारतात दिसणार आहे. त्यामुळे त्याचा सुतक काळ भारतातही प्रभावी ठरेल. चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी ९ तास आधी सुरू होणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून सुतक कालावधी सुरू होईल आणि ग्रहण संपल्यानंतरच संपेल. सुतक काळात शुभ आणि शुभ कार्ये वर्ज्य आहेत. या काळात मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात आणि पूजा केली जात नाही.