भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

अभिनेत्री माधुरी दीक्षित निवडणूक रिंगणात, भाजप तर्फे “या” मतदारसंघातून उमेदवार?

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीची राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. उमेदवारांनी देखील मतदारसंघावर आपली दावेदारी दाखवण्यास सुरुवात केली आहे. मात्र अशातच आता धकधक गर्ल सुपरस्टार अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतून भाजपातर्फे माधुरीला तिकीट दिले जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, नेमक्या कोणत्या मतदारसंघातून हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीतही माधुरी दिक्षीत लोकसभेची जागा लढवणार असल्याचे म्हटलं जात होतं. मात्र त्याचे पुढे काहीच झालं नाही. मात्र यंदा माधुरी निवडणूक लढणार असल्याचे म्हटलं जात आहे.

गृहमंत्री अमित शाह गणेशोत्सवादरम्यान 23 सप्टेंबरला मुंबईत आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांशी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे म्हटलं जात होतं. या चर्चेनंतर माधुरी दीक्षित-नेने भाजपाच्या तिकिटावर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे कळत आहे. मात्र माधुरी दीक्षितला मध्य मुंबईतून भाजपातर्फे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पुनम महाजन यांच्या मतदारसंघातून माधुरी दीक्षित यांना तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. भाजपाने मतदारसंघामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपाने नवीन प्रयत्न सुरु केल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीतही पुण्यातून भाजपाकडून अभिनेत्री माधुरी दीक्षित पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही भाजप सेलिब्रेटींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता होता. त्यासाठी भाजपने देशव्यापी सर्वेक्षणही केले होते. या सर्वेक्षणानुसार अभिनेत्री माधुरी दीक्षितला सुद्धा भाजपाकडून तिकीट मिळण्याची शक्यता होती. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी जून महिन्यात ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियाना अंतर्गत माधुरी दीक्षितची घरी जाऊन भेट देखील घेतली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!