महाभयंकर : ३० दिवसांत ६० हजार लोकांचा कोरोना मुळे मृत्यू!
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। झिरो कोविड धोरण मागं घेताच चीनमध्ये कोरोनानं थैमान सुरु केलं आहे. चीनमधील नवीन लाटेमुळं मोठं संकट निर्माण झालंय. चीनमधील शहरं कोरोना संसर्गाच्या विळख्यात येत आहेत.चीनच्या सर्वाधिक लोकसंख्येबाबत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हेनान प्रांतातील (हेनान) ९० टक्के लोक कोरोना संसर्गाला बळी पडले आहेत. हेनानच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानं ही माहिती दिली. चीनमध्ये कोरोना महामारीची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या शेजारील देशानं सुरुवातीला आकडेवारी लपविण्याचा प्रयत्न केला, पण जगाचा दबाव वाढत होता.
आता चीननं मृतांची संख्या जाहीर केलीये, जी धक्कादायक आहे. ताज्या आकडेवारीनुसार, चीननं गेल्या ३० दिवसांत ६० हजार लोकांच्या मृत्यूची नोंद केलीय. चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अधिकाऱ्यानं शनिवारी बीजिंगमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं की, ८ डिसेंबर ते १२ जानेवारी दरम्यान कोरोनामुळं ५९,९३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
चीनमध्ये रुग्णालये भरली आहेत. आता नवीन रुग्ण भरती करण्याची परिस्थिती नाही. अधिकृत माहितीनुसार, एका हॉस्पिटलमध्ये ६० हजार लोकांचा मृत्यू झाला. म्हणजे, घरी मरण पावलेल्या व्यक्तीचा या आकड्यात समावेश नाही. त्यापैकी ५,५०३ मृत्यू श्वसनसंस्थेतील बिघाडामुळं झाले आहेत, तर इतर मृतांना कोरोनासोबत इतर आजारही होते. असा दावा केला जात आहे की, मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ०९.०१ टक्के रुग्ण हे ६५ आणि त्यावरील होते.
शहरं आणि ग्रामीण भागात ताप आणि कोरोनाची लक्षणं असलेल्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असून लवकरच साथीच्या आजारावर नियंत्रण आणलं जाईल, असा दावा चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केलाय. चीननं गेल्या महिन्यातच कोरोनाविरुद्ध शून्य धोरणात सूट दिली होती. चीनवर कोरोनाची आकडेवारी लपवल्याचा आरोप आहे. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) देखील चीनला योग्य माहिती जगासमोर ठेवण्याचं आवाहन केलं. मात्र, चीनमधून जी माहिती समोर आली आहे, त्यानंतर जगभरात चिंता वाढलीये. अमेरिका, जपानसह इतर युरोपीय देशांमध्ये प्रकरणं वाढत आहेत आणि ती एक नवीन लाट म्हणून पाहिली जात आहे.