भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

महाराष्ट्र हादरला ; अल्पवयीन मुलीवर ११ जणांचा बलात्कार

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्रात एका अल्पवयीन मुलीवर ११ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची महाराष्ट्राला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना घडली, माहीम येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचे उघड झाले आहे.  याप्रकरणी पाच तरुणांना सातपाटी सागरी पोलिसांनी अटक केली असून अन्य सहा तरुणांचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पालघर च्या सातपाटी सागरी पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या माहीम चौकी दूरक्षेत्रातील माहीम पानेरीजवळ एका निर्जन ठिकाणी माहीम येथे राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीवर ११ तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणांपैकी अनेक तरुण हे गर्दच्या आहारी गेल्याची माहितीही समोर येत आहे. ही मुले माहीम, हनुमानपाडा, टेम्भी, सफाळे, वडराई भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा तपास सुरू आहे. या मुलीवर जबरदस्ती करण्यात आल्यानंतर त्या मुलीने माहीम पोलिस चौकी गाठत या तरुणांविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर सातपाटी सागरी पोलिस स्टेशनमध्ये पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली . 

सायंकाळ नंतर पालघरमधील अनेक समुद्रकिनाऱ्यावर शुकशुकाट असतो. येथील सुरूची बने, झुडपांत नशेबाजांचा वावर असतो. एकट्या-दुकट्या व्यक्तीला गाठून लुटण्याच्या घटनाही येथे घडल्या आहेत त्यामुळे गस्त वाढवावी, नशेबाजांवर कारवाई करावी अशी मागणी यापूर्वीही ग्रामस्थांनी केली होती. त्यांना व्यसनांसाठी पदार्थ कोठून मिळतात हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!