महाविकास आघाडीची विकेट पडेल – भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील
मुंबई,मंडे टू मंडे,न्युज वृत्तसेवा। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून आमदारांना फोन करण्यात येत आहेत. त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे,असा आरोप केला जात असून यांच्या आरोपाला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीची विकेट पडेल. राज्यसभेला देखील भाजपा ११ मते हवे होती, मात्र आम्ही चमत्कार करुन दाखवला, असे पाटील म्हणाले.
तसेच नाना पटोले यांचे म्हणणे आहे ते २० तारीखचा निकाल लागण्या सारखे आहे. ते त्यांची स्क्रिफ्ट आतापासूनच तयार करत आहेत. राजकारणात जिंकेपर्यत किंवा निकालापर्यंत काही बोलायचे नाही. त्यांच्यातील बेबनावचा फायदा आम्हाला नक्कीच होईल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवसेना नेते खासदार संजय राऊत अपक्षांना घरगडी समजत आहेत. त्यांना त्यांचे उत्तर या निवडणुकीतून मिळेल, असे ते म्हणाले.
भाजपचा आपल्या कुठल्याही आमदारावर अविश्वास दाखवत नाही. आमचे केंद्रीय उपाध्यक्ष जय पांडा येत आहेत. विधान परिषद निवडणूक प्रक्रिया समजून सांगितली जाईल. तसेच लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोघांना सहायकाची परवाणगी मिळाली आहे. लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाशी देवेंद्र फडणवीस बोलतील. मुक्ताताई १९ ला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये पोहोचतील आणि स्टेबल होऊन मतदानाला येतील, असा दावा
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला.