भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी : महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागा लढविणार,वाचा

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीमध्ये जागा वाटपासंदर्भात जोर- बैठका सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आली असून भाजप लोकसभेच्या ३२ जागा लढवणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने केंद्रातील भारतीय जनता पक्ष आणि राज्यातील भाजप, शिंदे , अजित पवार गटाची महायुती कामाला लागली आहे. अशातच महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला असून भाजप राज्यामध्ये ३२ लोकसभेच्या जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच महायुतीचे घटक पक्ष शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला १६ जागा मिळणार आहेत. ज्यामध्ये शिंदे गट १० जागा तर अजित पवार गट सहा जागा लढवणार आहे. आज मंगळवार, १६ जानेवारी रोजी भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह दिल्लीमध्ये महत्वाची महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीत भाजपच्या या ३२ लोकसभेच्या जागांचा आढावा घेतला जाणार आहे.

येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे पुन्हा एकदा धक्कातंत्र पाहायला मिळणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून लोकसभेसाठी दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे. आजच्या दिल्लीच्या बैठकीत याबद्दलचीही नावे समोर येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!