घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठे बदल, एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त होणार?
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही आता गगनाला भिडू लागल्या आहेत. सोनं-चांदी, पेट्रोल-डिझेल आणि दूध, भाज्या अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस महागाईची हुलकावणी देत आहेत. त्यातून घरगुती सिलेंडरच्या किमतींमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, घरगुती सिलेंडरच्या किमतींमध्ये एक मोठी अपडेट समोर येते आहे. मार्च महिन्याच्या एक तारखेपासून आता एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठे बदल करण्यात आले असल्याचे कळते आहे.
मार्च महिन्यातापासून एलपीजी गॅस सिलेंडर म्हणजे घरगूती गॅस सिलेंडर हा स्वस्त होणार आहे. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर कितीनं स्वस्त होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला महागाईनं घेरलं आहे. त्यातून दिवसाला होणारा खर्च हा आपल्या प्रत्येकासाठी एक कळीचा मुद्दा आहे. त्यातून आपल्याला सर्वात जास्त सतावणारा मुद्दा आहे तो म्हणजे गॅस सिलेंडरचा. गॅस सिलेंडरच्या किमती या दिवसेगणिक वाढू लागल्या असताना आता ग्राहकांना गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे. यंदा गृहिणींसाठी ही एक आनंदाची बातमी असून यावेळी काहीसा दिलासा आपल्या सगळ्यांना गॅस सिलेंडरमधून मिळणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीत एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत ही 1053 रूपये इतकी आहे. ही किंमत 14.2 किलो गॅस सिलेंडरची आहे. तर मुंबईत 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1052.50 इतकी आहे. कोलकत्तामध्ये याच सिलेंडरची किंमत ही 1079 रूपये इतकी असून चैन्नईमध्ये 1068.50 इतकी आहे.