महाराष्ट्रराजकीय

कॉंग्रेसचे आमदार फडणवीसांच्या भेटीला, शिवसेनेनंतर आता कॉंग्रेसमध्ये फूट?

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातील राजकारणात मोठी घडामोड होत शिवसेनेच्या अनेक आमदार-खासदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील माहाविकास आघाडी सरकर कोसळलं. दरम्यान शिवसेनेत झालेल्या या बंडखोरीनंतर आता कॉंग्रेसला देखील खिंडार पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर राज्यात शिवसेनेनंतर आता कॉंग्रेसचे आमदार फुटणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

गेल्या दोन महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे गटातील ४० आमदार फुटले आणि राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर महाराष्ट्रात कॉंग्रेसमध्ये देखील अस्वस्थता दिसून येत होती, बहुमताच्या चाचणीवेळी देखील कॉंग्रेसचे आमदार सभागृहाच्या बाहेर राहिले होते. तेव्हापासून कॉंग्रेसचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत काय असे बोलले जात होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अस्लम शेख यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

दरम्यान आता संग्राम थोपटे यांनी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर संग्राम थोपटे यांची फडणवीसांसोबत गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या भेटीमुळे कॉंग्रेमध्ये देखील बंडखोरी होणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!