भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

“मातोश्री” वर ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक, असा कोणता विश्वास दिला उद्धव ठाकरेंनी आमदारांना ?

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्ष प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाच्या विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांची आज 13 मे रोजी मातोश्री इथे बैठक पार पडली. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिलेल्या निकालानंतर ठाकरे गटाची पुढची रणनीती काय असणार यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना, नेत्यांना मार्गदर्शन केलं. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासह कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही चर्चा झाली. भाजपचं फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नाही. भाजपला कर्नाटकातून घालवलं आता महाराष्ट्रातूनही घालवू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात मोठा निकाल दिला. १६ आमदारांच्या अपात्रेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला. या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार वाचलं. सोबतच तत्कालीन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढले. तसंच शिंदे गटाने प्रतोदपदी केलेली भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली.

काय झालं मातोश्रीवरच्या बैठकीत ?
आमदारांच्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर चर्चा झाली. सर्व आमदरांना हा निकाल समजावून सांगण्यात आला. हा निकाल आपल्या बाजूने कसा आहे हे सांगण्यात आलं. “आता हा निकाल लोकांपर्यत पोहोचला पाहिजे, लोकांना समजावून सांगितलं पाहिजे म्हणजे लोकांचा या निकालावर विश्वास वाढेल,” असं उद्धव ठाकरेंनी आमदारांना सांगितलं. तसंच पुढील आठवड्यात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यांनाही असेच आदेश दिले जातील.

कर्नाटकातून घालवलं, आता महाराष्ट्रातून घालवू
बैठकीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा झाली. दक्षिणेचा पट्टा भाजपच्या हातून निसटला आहे. भाजपला कर्नाटकात नाकारलं आहे. भाजप फोडाफोडीचं राजकारण करतं आहे, हे लोकांना आवडलेलं नाही. कर्नाटकातून घालवलं, आता महाराष्ट्रातूनही घालवू, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!