भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

Monsoon : राज्यातील ‘या’ जिल्ह्याना २०,२१ जून ला ऑरेंज अर्लट,पावसाचा जोर वाढणार!

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मान्सूनचं आगमन झाल्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने अगदी जोरदार हजेरी लावली. मात्र, काही ठिकाणी अजूनही पावसान दर्शनही दिलं नाही. पाऊस लांबल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे, शेतीची मशागत करून आता पेरणी कधी होणार याच चिंतेत तो दिसत आहे. तर नाशिकसारख्या दुर्गम भागात पावसाळा सुरू होऊनही पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

परंतु आता पावसाच्या बाबतीत एक चांगली बातमी समोर येत आहे. येत्या ५ दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता असून त्यानंतरच्या ३ दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊल होईल. मुंबई ठाण्यातही रविवार पासून मुसळधार पावसाची शक्यता दिसत आहे.

भारतीय हवामान खाते, मुंबई, कुलाबा वेध शाळे कडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार १९ जून २०२२ रोजी जिल्ह्यात जोरदार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.  तसेच २० जून २०२२ व २१ जून २०२२ या दोन दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अर्लट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जोरदार ते अति जोरदार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

उत्तर महाराष्ट्र,विदर्भ, मराठवाडा कोरडाच
राज्यात मान्सूनचं आगमन झालं असूनही मराठवाडा आणि विदर्भ अजूनही कोरडाच असलेला पाहायला मिळत आहे. तुरळक ठिकाणचा पाऊस वगळता या ठिकाणी म्हणावा असा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे इथला शेतकरी वर्ज अजूनही चिंतेत आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही काही वेगळी परिस्थिती नाही. नाशिक जिल्ह्यातील काही दुर्गम भागात अजूनही टँकरने तहान भागवली जात आहे. त्यामुळे पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना कधी दिलासा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!