भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

विश्रांतीनंतर सोने- चांदी च्या भावात मुसंडी, बघा आजचे भाव

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। 15 सप्टेंबरपासून सोने-चांदीने मोठी मुसंडी मारली आहे. दोन्ही मौल्यवान धातूंनी सलग पाचव्या दिवशी पण भावात वाढच होत गेली. सोन्या सोबतच चांदीच्या भावातही सतत वाढ झाली.

सोने-चांदीत गेल्या पाच दिवसांत इतकी दरवाढ झाली
पंधरा दिवस सोन्या च्या भावात घसरण होत होती.परंतु शुक्रवारी 15 सप्टेंबरला सोन्याने घसरणीला ब्रेक देत 15 आणि 16 सप्टेंबर रोजी सोन्यात भावात प्रत्येकी 200 रुपयांची वाढ झाली. 17 आणि 18 सप्टेंबर रोजी सोने 150 रुपयांनी वधारले. 19 सप्टेंबर रोजी 150 रुपयांनी दर वधारले. या पाच दिवसांत 700 रुपयांची दरवाढ झाली. 22 कॅरेट सोने 55350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,370 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे.

चांदीच्या भावात 1000 रुपयांची वाढ
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला 5000 रुपयांनी स्वस्त झाली होती. गेल्या पंधरा दिवसांत चांदीत घसरणीचे सत्र सुरु होते. 15 आणि 16 सप्टेंबर रोजी चांदीत 1200 रुपयांची दरवाढ झाली. तर 18 सप्टेंबर रोजी 200 रुपयांनी किंमती घसरल्या. 19 सप्टेंबररोजी चांदीने 300 रुपयांची दरवाढ नोंदवली. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 74,800 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट सोने 59,324 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 59,086 रुपये, 22 कॅरेट सोने 54341 रुपये, 18 कॅरेट 44,493 रुपये, 14 कॅरेट सोने 34,705 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,212 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!