भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

नागपंचमी : श्रावण महिन्यातील पहिला सण, पंचमीलाच का साजरी केली जाते नागपंचमी? काय महत्व आहे या दिवसाला? जाणून घेऊ तिथी, शुभ मुहूर्त

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। अनेक सण व उत्सव सुरु होतात श्रावण महिना सुरु झाला की, भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो हा महिना या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत-वैकल्ये व उपासना करतात.

आज नागपंचमी श्रावण महिन्यातील पहिला सण, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच आज २१ ऑगस्ट २०२३ रोजी सोमवारी, हा दिवस नागांच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. पंचमी तिथी ही सापांना अतिशय प्रिय मानली जाते. परंतु, पंचमीलाच नागपंचमी का साजरी केली जाते? सविस्तर जाणून घेऊया

पौराणिक कथेत असे सांगितले आहे की, पृथ्वीच्या आत नाग लोकात शक्तिशाली साप राहातात. सांपाबद्दल एक नाही तर अनेक समजूती आहेत. नागपंचमीच्या पूजेची सुरुवात कशी झाली व ही तिथी सापांना अधिक प्रिय का?.

कशी झाली सापांची उत्पत्ती?
पुराणानुसार, महर्षी कश्यप यांना अनेक पत्नी होत्या, त्यापैकी एकाचे नाव कद्रू आणि दुसरीचे नाव विनिता. एकदा महर्षि कश्यप यांनी कद्रूच्या पत्नीवर प्रसन्न होऊन तिला नागांची आई होण्याचे वरदान दिले. अशा प्रकारे सापांची उत्पत्ती झाली. त्याचवेळी ऋषी कश्यपची दुसरी पत्नी विनिता. पक्षीराज गरुडाची माता झाला. कद्रू आणि विनिता यांच्यात नेहमी ईर्षा असायची. शाप मिळाल्यावर नागपुत्र दु:खी झाला आणि वासुकी या नागाचे नेतृत्व करून तो ब्रह्माजींकडे पोहोचला. ब्रह्माजी म्हणाले काळजी करू नका. तुला जरतकरू ही बहीण असेल, तिचा विवाह जरतकरू नावाच्या ऋषीशी होईल. या दोघांपासून अस्तिक नावाचा पुत्र होईल. तो हा यज्ञ थांबवून सापांचे रक्षण करेल. ते ऐकून नागाला खूप आनंद झाला.

वेळ आल्यावर राजा परीक्षिताचा नागाने मृत्यू झाल्यानंतर सर्पवंशाचा नाश करण्यासाठी राजा जनमेजयाने सर्प मेध यज्ञाचे आयोजन केले. या यज्ञात लाखो कोटी सर्प जळून राख झाले असता अस्तिक मुनी तेथे पोहोचले आणि त्यांनी सर्प यज्ञ थांबवून नागांवर थंड दूध ओतले. त्यामुळे सापांच्या अंगाला गारवा तर मिळालाच, सोबतच भाताचा लावाही ठेवला. त्यामुळे सापांचे प्राण वाचले. सापांचे अस्तित्व पृथ्वीवर राहिले. ज्या दिवशी ब्रह्माजींनी सापांना जगण्याचे वरदान दिले.ज्या दिवशी ब्रह्माजींनी सापांन जगण्याचे वरदान दिले. त्या दिवशी पंचमी तिथी होती. ज्या दिवशी अस्तिक मुनींनी यज्ञ केला.

उपवास का केला जातो नागपंचमीचा?
असे म्हटले जाते की, सत्येश्वरी देवीमुळे नागपंचमीचा उपवास केला जातो. सत्येश्वरीला भाऊ होता. त्याचे नाव सत्येश्वर असे होते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्येश्वरीचा अकस्मिात मृत्यू झाला. भावाच्या विरहामुळे सत्येश्वरी दु:खी होती. अन्नत्याग केल्यानंतर सत्येश्वर नागरुपात दिसला. त्यानंतर तिने नागाला आपले भाऊ मानले. सत्येश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल, असे नागदेवतेने वचन तिला दिले. तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या.

नागपंचमी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त व पूजा पद्धत
१. नागपंचमी तिथी व मुहूर्त


नागपंचमीची तारीख २१ ऑगस्ट २०२३, सोमवार १२.२० मिनिटांनी असेल, म्हणजेच आज

नागपंचमी पूजा मुहूर्त – सकाळी ५.५३ ते ८.३० पर्यंत

नागपंचमीची तारीख २२ ऑगस्ट २०२३, मंगळवारी दुपारी २.०० वाजता संपेल.

नागपंचमी चे महत्त्व
श्रावण महिन्यात नागांच्या पूजेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या महिन्यात भगवान शंकराच्या लाडक्या नागाचे दर्शन घेणे खूप शुभ मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यास धनात वृद्धी होते, असे मानले जाते.नागपंचमी पूजा मुहूर्त – सकाळी ५.५३ ते ८.३० पर्यंत.

नागपंचमी उपाय
जर एखाद्या व्यक्तीला काल सर्प दोषाचा त्रास होत असेल तर नागपंचमीच्या दिवशी वाहत्या नदीत चांदीच्या नागाची जोडी तरंगवावी किंवा एखाद्याला दान करावी, असे केल्याने काल सर्प दोषाचा प्रभाव संपतो.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!