भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यावर नवं संकट,पुढचे दोन दिवस कठीण

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. ऊर्जामंत्र्यांच्या लेखी आश्वसनानंतर राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला असला तरी आता नवं संकट राज्यावर घोंगावत आहे. पुढील दोन दिवस संकटाचे असल्याचं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, हे राज्य अंधारात बुडू देणार नाही. विजेच्या क्षेत्रात सर्कस करावी लागते. पुढचे दोन दिवस कठीण आहेत. दोन दिवस कोळशाचा पुरवठा होऊ शकला नाही, तर त्याचे परिणाम होऊ शकतात. पण भारनियमन होणार नाही. गरज पडली तर पॉवर एक्सचेंजमधून वीज विकत घेऊ असंही उर्जा मंत्री राऊत यांनी सांगितले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!