भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयक्राईममहाराष्ट्र

दागिने व रोख रक्कम घेऊन पळलेली नववधू… निघाली चक्क तीन मुलांची आई…

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। लग्न म्हटलं म्हणजे नव्या संसाराला सुरुवात,प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा आणि महत्वाचा क्षण, दोन जीव एकत्र येऊन एकमेकांच्या सुख; दुःखात सहभागी होऊन सात जन्माचे साथी… मात्र आशा काही घटना विचित्र घडतात…अशीच एक घटना घडली… हातावरील मेहंदी ही सुकली नाही …की लग्न झाल्या झाल्याचं अवघ्या १२ दिवसात वेगळाच प्रकार समोर आला..एका बनावट आणि लुटारू नववधूने लग्नाच्या नावाखाली तरुणाची मोठी फसवणूक केली,

ही नवरी लग्नाच्या १२ व्या दिवशीच पतीच्या घरातून १६ तोळे सोनं आणि ७५००० रुपये रोख घेऊन पळून गेली. एव्हढच नाहीतर नववधू बाबत एक वेगळीच धक्कादायक माहिती तपासात समोर आली, ही नववधू चक्क आधीच तीन मुलांची आई असल्याचं समोर आलं .

ही घटना राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील दादिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.पिपराली भागातील सुरेश कुमार शर्मा यांनी या संदर्भात २९ मे रोजी तक्रार नोंदवली होती . या तक्रारीवरून पोलिसांनी नववधू गगनदीपला अटक केली. ती श्रीगंगानगर येथील रहिवासी असून पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, सुरेशने १५ मे रोजी दलालामार्फत गगनदीपशी लग्न केलं होतं. त्या मोबदल्यात दलालांनी त्याच्या खात्यात ५३ हजार रुपये ऑनलाइन टाकायला लावले आणि नंतर २३ हजार रुपये रोख घेतले.

लग्नानंतर सुरेश गगनदीपसोबत राहू लागला. मात्र लग्नानंतर अवघ्या १२ दिवसांतच गगनदीप घरातून १६ तोळे सोन्याचे दागिने आणि ७५००० रुपये रोख घेऊन फरार झाली. सुरेशच्या तक्रारी वरून पोलिसांनी एक पथक तयार करून तिचा शोध सुरू केला. दरम्यान, गगनदीप श्रीगंगानगरला जाणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली.

त्यावर पोलिसांनी भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या श्रीगंगानगर जिल्ह्याच्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधून नवंवधूचा फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवला. या फोटोच्या माध्यमातून पोलिसांनी गगनदीनला श्रीगंगानगर येथून पकडलं. त्यानंतर तिला दादिया येथे आणून चौकशी करण्यात आली. चौकशीत समोर आलं की गगनदीप विवाहित असून तिला तीन मुलं आहेत. गगनदीपच्या माध्यमातून पोलिसांचा दलालांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असून चौकशीदरम्यान आणखी बऱ्याच काही घटना उघड होण्याची शक्यता असल्याने कसून चैकशी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!