भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

नितीन गडकरींना धमकी देणारा सापडला! धमकीचा फोन का,कुठून केला? कुणाच्या सांगण्यावरून?

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना काल अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी देणारा फोन केला होता. राजकारणातील अजातशत्रू असलेल्या गडकरी यांना धमकावणारा फोन आल्याने सर्वांच्याच काळजात धस्स झाले अन् एकच खळबळ उडाली. सर्वांशी चांगले संबंध असणाऱ्या गडकरी यांना कोण धमकी देऊ शकतं? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला गेला. कदाचित हा फेक कॉल असून कोणी तरी खोडसाळपणा केला असावा असा कयासही वर्तवला गेला. पण हे सर्व अंदाज खोटे ठरले आहेत. गडकरी यांना एका खतरनाक गुंडाने धमकावणारा कॉल केला असून तो कर्नाटकातील एका तुरुंगात शिक्षा भोगत असल्याचं उघडकीय आल्याने पोलीस यंत्रणेच्या तोंडचं पाणी पळालं आहे.

कोण आहे हा धमकी देणारा
जयेश कांता असं या गँगस्टरचं नाव आहे, जयेश कांता हा कुविख्यात गँगस्टर आहे. तो कर्नाटकाच्या बेळगावमधील तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्यानेच नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकावणारा फोन केल्याचं उघड झालं आहे. हत्येच्या प्रकरणात तो शिक्षा भोगत आहे. त्याने तुरुंगातून अवैधरित्या फोनचा वापर करून गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन केल्याचं नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं.


कांताने गडकरी यांना धमकीचा कॉल का केला? त्यामागचं कारण काय? कुणाच्या सांगण्यावरून हा कॉल करण्यात आला? तुरुंगातूनच कॉल का केला? फोन करण्यासाठी कुणाचा मोबाईल वापरला होता? त्याला गडकरी यांच्या कार्यालयाचा नंबर कसा मिळाला? याचा छडा लागण महत्वाचं असून हा नंबर कोणी दिला का? यासह असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी नागपूर पोलीस आता बेळगावच्या तुरुंगात जाऊन कांता याची चौकशी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, बेळगाव जेल प्रशासनाने कांताकडून एक डायरी जप्त केली आहे. नागपूर पोलिसांनी आरोपीसाठी प्रोडक्शन रिमांड मागितली आहे. आरोपीचा अधिक तपास करण्याची गरज आहे. त्यासाठी त्याला महाराष्ट्रात आणण्याची गरज आहे, असं नागपूर पोलिसांनी सांगितलं.


दरम्यान, या धमकीच्या फोननंतर नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गडकरी यांच्या कार्यालयात सकाळी 11.25 आणि 11.32 वाजता धमकीचे फोन आले होते. त्यानंतर 12.32 वाजताही एक कॉल आला होता. असे एकूण तीन कॉल गडकरींच्या कार्यालयात करण्यात आले. त्यामुळे आरोपीचे कॉल डिटेल रिकॉर्ड तपासले जाणार असून त्याचं अॅनालिसिस केलं जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!