दिलासा नाहीच? पुन्हा वाढू शकतात पेट्रोल-डिझेलचे दर !
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नुकताच एक दिवसांपूर्वी महागाईपासून काहीसा दिलासा देत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घसरण झाली. त्या पाठोपाठ राज्य सरकारने सुद्धा काही प्रमाणात का होईना दरात कपात केली परंतु बाजार विश्लेषकांनुसार, ग्लोबल मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पेट्रोलियम कंपन्या पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवू शकतात असे संकेत दिले.त्या मुळे सामान्यांच्या खिशाला पुन्हा झळ बसणार का?
- मुक्ताईनगर मध्ये लक्षवेधी लढतीत पुन्हा महायुतीचे चंद्रकांत पाटील विजयी, रोहिणी खडसे पराभूत
- रावेर मधून महायुतीचे अमोल जावळे ४३ हजारांच्या वर मतांनी विजयी
- मोठी ब्रेकिंग : रावेर मधून अमोल जावळे पाच हजाराने पुढे
आज ग्लोबल मार्केटमध्ये ब्रेंट क्रूडचा भाव आज 113 डॉलर प्रति बॅरलजवळ पोहोचला आहे. जाणकारांनी आधीच जर कच्च्या तेलाचा दर 110 डॉलरच्या वर गेल्यास कंपन्यांना पेट्रोल-डिझेल दर पुन्हा वाढवावा लागू शकतो असा अंदाज वर्तवला आहे. केंद्राकडून एक्साइज ड्यूटी आणि राज्यांनी वॅटमध्ये कपात केल्यानंतर इंधन दर कमी झाला. परंतु आता अशा परिस्थितीत पुन्हा पेट्रोलियम कंपन्यांना दर वाढवण्याची संधी मिळू शकते.असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबईत सध्या पेट्रोल 109.27 रुपये लीटर आहे. महाराष्ट्र सरकारने पेट्रोलवर वॅट 2.08 रुपये लीटर आणि डिझेलवर 1.44 रुपये लीटर कपात केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी केलं आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेल दर कमी झाला आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव 7.16 रुपये आणि डिझेलचा भाव 7.49 रुपयांनी कमी झाला आहे. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते असं गणित सांगितलं गेलं.