आता राष्ट्रवादीही ईडी च्या रडारवर? पवार कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांवर ईडीची धाड
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झालेली असताना आता शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या बँकेत ईडीने धाड टाकली आहे. आज सकाळीच ईडीने कराड जनता बँकेत बेकायदा कर्ज वाटप केल्याप्रकरणी छापा टाकण्यात आला. या बँकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. तर, शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय संचालकपदी आहेत. त्यामुळे या बँकेवर झालेल्या ईडी कारवाईची आता जोरदार चर्चा सुरू आहे.
वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यालाही याच बँकेने कर्ज दिले होते. आता, ही बँकसुद्धा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कराडमध्ये प्रसिद्ध असलेल्या या बँकेत करोडो रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार राजेंद्र पाटील यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन ईडीने कराड बँकेच्या संचलकांची चौकशी सुरू केली आहे. संचालकपदी शरद पवार आणि अजित पवारांचे निकटवर्तीय असल्याने या प्रकरणाची तालुकाभर चर्चा सुरू आहे. तसेच, याआधी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विलास सुर्यवंशी यांच्याकडेही तब्बल दहा तासाहून अधिक काळ चौकशी झाली होती. त्यानंतर ही धाड टाकल्याने पुढे काय होतं हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.
काय आहेत आरोप?
या बँकेत करोडो रुपयांचा गैरव्यवहार झाले आहेत. तसेच, अस्तित्वात नसलेल्या लोकांच्या नावे कर्ज वाटप केल्याचीही यामध्ये तक्रार करण्यात आली आहे.