आता नोटांची होणार फिटनेस टेस्ट, फेल नोटा बाद होणार; त्या बदल्यात नवीन नोटा कुठे मिळतील?
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनी नोटांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता नोटांचा फिटनेस तपासला जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने ते अनिवार्य केलं आहे. रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना नोटा मोजण्याच्या मशीनऐवजी नोटांचं फिटनेस चेक करण्याची मशीन वापरण्यास सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने नोटांच्या योग्यतेसाठी ११ मापदंड निश्चित केली आहेत. तुमच्या खिशात पडलेल्या नोटा ठरवून दिलेल्या मापदंडांची पूर्तता करत नसल्यास, बँका त्यांना फिटनेस टेस्टमध्ये बाजूल केल्या जातील.
बँकांकडे असतील फिटनेस सॉर्टिंग मशीन
रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना नोट सॉर्टिंग मशीनऐवजी फिटनेस सॉर्टिंग मशीन वापरण्यास सांगितले आहे. बँकिंग व्यवस्थेत अनफिट नोटा दीर्घकाळ चालत आहेत. केंद्रीय बँकेचे म्हणणे आहे की, जास्त वापरामुळे नोटा घाण होतात आणि त्यांची प्रिंट खराब होऊ लागते. अशा नोटा देखील अनफिट आहेत.
फिटनेस चाचणीमध्ये डॉग इयर्स करन्सी (कोपऱ्यांनी दुमडलेल्या नोटा), अनेकदा दुमडलेल्या नोटा, रंग नसलेल्या नोटा आणि गम किंवा टेपने चिकटवलेल्या नोटा चलनातून बाहेर काढल्या जातील. बँकांना दर तीन महिन्यांनी नोटांच्या फिटनेस चाचणीबाबतचा अहवाल रिझर्व्ह बँकेला पाठवावा लागणार आहे. किती नोटा कोणत्या मानकांची पूर्तता करू शकल्या नाहीत हे अहवालात सांगावे लागेल.
फाटलेल्या नोटा, कोपऱ्यांमध्ये दुमडलेल्या नोटा, धुतल्यामुळे खराब झालेल्या नोटा, डाग पडलेल्या नोटा, रंग उडालेल्या नोटा, चिकट गम किंवा चिकटपट्टीने चिकटवलेल्या नोटा, धुळीमुळे खराब झालेल्या नोटा, जीर्ण नोटा, नोटांवर लिखाण केले असल्यास, ८ चौरस मिलीपेक्षा मोठा छिद्र असलेल्या नोटा फिटनेस टेस्टमध्ये फेल होतील.
फिट नोटा कुठे मिळतील?
नोट सॉर्टिंग मशिनमध्ये फक्त बनावट किंवा खराब नोटाच वेगळ्या करत असे. मात्र आता नव्या आदेशामुळे आता अनफिट नोटा बाजून केल्या जातील, त्याऐवजी ग्राहकांना दुसरी फिट नोट बँकेकडून देण्यात येईल.