भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

डॉक्टरच्या अत्याचारातून नर्स गर्भवती,डॉक्टरी पेशाला काळिमा

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यभरात अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत असून आताच विदर्भातील वाशिम जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली. याठिकाणी रिसोडच्या इंगोले बाल रुग्णालयात वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला .

विदर्भातील रिसोडच्या इंगोले बाल रुग्णालय व प्रसूतिगृहामध्ये ५ ते ६ महिन्यांपासून एक महिला नर्सचे काम करत होती. या दरम्यान डॉक्टरने त्या महिलेवर तिच्या मनाविरुद्ध वारंवार अत्याचार केले. या प्रकारातुन ही महिला नर्स गर्भवती राहिली. यानंतर डॉक्टरने या महिलेला जबरजस्ति गर्भपात करायला लावला. इतकेच नव्हे तर डॉक्टरने हा गर्भ जमिनीत सुद्धा पुरला होता. पीडित महिलेने रिसोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी नराधम डॉक्टरविरोधात अत्याचाराच्या गुन्ह्यासह विविध गुन्हे दाखल केले असून त्याला अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!