भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्रसामाजिक

ब्रेकिंग ; व्यवसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ,व्यवसायिकांना मोठा झटका

मंडे टू मंडे न्युज वृत्तसंकलन।

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका बसला आहे, आज एक एप्रिल 2022 चालू आर्थिक वर्षाचा पहिला दिवस, एप्रिलच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर असून, व्यवसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.

सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी ने दिलेल्या माहितीनुसार आजपासून व्यवसायिक सिलिंडरच्या दरामध्ये तब्बल 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 22 मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती, तर व्यवसायिक सिलिंडर स्वस्त झाले होते. मात्र आज घरगुती सिलिंडरचे दर स्थिर असून, व्यवसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हा व्यवसायिकांसाठी मोठा झटका मानण्या येत असून, सिलिंडरचे दर वाढल्याने हॉटेलमधील जेवन महाग होणार हे मात्र नक्की.

घरगुती गॅसच्या किमती स्थिर
आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत स्थिर ठेवण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा  मिळाला आहे. राजधानी दिल्लीमध्ये सुधारीत गॅस सिलिंडरच्या दरानुसार घरगुती गॅसची किंमत 949.5 रुपये आहे. तर कोलकातामध्ये 976 रुपये प्रति सिलिंडर इतकी आहे. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरसाठी 949.50 रुपये मोजावे लागत आहेत. तर दुसरीकडे आज व्यवसायिक गॅसच्या किमतीमध्ये तब्बल 250 रुपयांची वाढ करण्यात आली असून, व्यवसायिक गॅस सिलिंडरची किंमत प्रति सिलिंडर 2,205 रुपयांवर पोहोचली आहे. दरवाढीपूर्वी मुंबईत व्यवसायिक सिलिंडरची किंमत 1,995 इतकी होती. व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!