भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयसामाजिक

तेलाच्या किंमतीत घसरण, खाद्यतेल लवकरच ३० रुपयांनी स्वस्त

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गृहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या किचनचे बजेट आता आणखी स्वस्त होणार आहे. तर घराच्या भाजीला स्वस्ताईची फोडणीने चव येणार आहे. खाद्यतेल लवकरच ३० रुपयांनी स्वस्त होणार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने याविषयीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, या महिन्याच्या, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात खाद्यतेलाच्या किंमतीत ३० रुपयांची घट येईल. एवढंच नाही तर सरकार खाद्यतेलावरील सेवा शुल्कात अजून कपात करण्याची ही शक्यता आहे. सरकारने यासाठी कंपन्यांकडून सूचना मागवल्या आहेत. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत खाद्यतेल घरातील किचनमध्ये गोडवा आणेल हे नक्की. एक लिटरची बाटली आणि पाऊच्या किंमतीत ३० रुपयांच्या कपातीची घोषणा करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने हा फायदा होणार आहे. मध्यंतरी तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने घराचे बजेट वाढले होते आणि सर्वसामान्य माणूस महागाईने होरपळला होता.

कंपन्यांची दर कपात
अडाणी विल्मर कंपनीने त्यांच्या खाद्यतेल उत्पादनावरील दरात १० ते ३० रुपयांपर्यंत प्रति लिटर कपात केली आहे. तर जेमिनी एडिबल अँड फॅट्स कंपनीने ही त्यांच्या उत्पादनावर ८ रुपये ते ३० रुपयांपर्यंत प्रति लिटर कपात केली आहे. इमामी अॅग्री कंपनीने एमआरपीवर ३५ रुपयांपर्यंतची कपात केली आहे. कंपन्यांच्या या कपात धोरणाचा परिणाम सर्वसामान्यांच्या किचन बजेटवर दिसून येईल. त्यांना पहिल्यापेक्षा स्वस्त खाद्य तेल खरेदी करता येईल. मदर डेअरीने सुद्धा त्यांच्या खाद्यतेलाच्या किंमती उतरवल्या आहेत. त्यांनी तेलाच्या किंमतीत १५ रुपये प्रति लिटर कपात केली आहे. यामध्ये सोयाबीनचे तेल आणि राईसब्रान तेलाचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!