धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्या- चांदीच्या दरात घसरण सुरूच
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गुरुवारी सोन्या, चांदीचे दर मंदावल्यानंतर आज पुन्हा एकदा धनत्रयोदशी निमित्त दोघांच्या दरात विक्रमी घसरण पाहायला मिळत आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, त्यामुळे आज सोनारांच्या दुकानात मोठी गर्दी होताना दिसेल. सोन्याचा भाव 60,950 तर, चांदीचा भाव 73,300 आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरू आहे.
गेल्या गुरुवारी राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 400 रुपयांनी घसरला होता. त्यामुळे सोन्याचा भाव 61 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे. आता या घसरणीमुळे सोन्याचा भाव 60,950 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 61,350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
चांदीही स्वस्त
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) सौमिल गांधी म्हणाले की, “गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. परदेशातील मंदीच्या व्यवहारानंतर दिल्लीच्या बाजारातील सोन्याचा वायदा भाव 400 रुपयांनी घसरून 60,950 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होता. यासोबतच चांदीच्या भावातही घसरण झाली आहे. चांदीचा भावही 300 रुपयांनी घसरून 73,300 रुपये प्रति किलोवर बंद झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,950 डॉलर प्रति औंस झाला तर, चांदीचा भाव 22.45 डॉलर प्रति औंसवर बंद झाला. सौमिल गांधी म्हणाले की, व्यापारी आता यूएस मॅक्रो इकॉनॉमिक डेटा आणि फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांच्या इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) मधील भाषणातून अधिक संकेत शोधत आहेत.