भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट, पुढील सहा दिवस मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l  शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे, राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट घोंगावत आहे. गोल्या चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. या गारपिटीचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे.

१२ एप्रिल ते १८ एप्रिलपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान अभ्यासकाच्या अंदाजानुसार पुढील सहा दिवस राज्यातील वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, सोबतच विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आला आहे.

मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारा आणि विजाच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसाचा स्वरुप सर्वदूर असं जरी नसलं तरी मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे हवामान विभागाकडून देखील हायअलर्ट देण्यात आला आहे, हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपिटीचा देखील अंदाज आहे.

आज हवामान विभागाकडून विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे लातूर, बीड, जालना, सोलापूर, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर आणि इतर अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून गारपिटीसह पाऊस सुरू आहे, या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. फळबागांचं मोठं नुकसानं झालं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!