राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीच संकट, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह “या” भागात पडणार जोरदार पाऊस
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात ऐन मार्च एप्रिल महिन्यात पाऊस पडत असल्याने तोही गारांचा पाऊस पडल्याने राज्यावर अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं आहे. आता हवामान विभागान पून्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा दिला असल्याने पावसाच्या संकटाशी सामना करावा लागणार आहे.
महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे, परंतु अजूनही अवकाळी पावसाचं राज्यावरील संकट टळलेल नाही, आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (IMD) जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागांन दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटाह पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.इतकेच नाही तर नुसता पाऊसचं पडणार नसून, या काळात सोसाट्याचा वारा देखील तोही ३०-४० प्रतीतास किमी वेगानं वाहण्याचा अदांज हवामान विभागानं वर्तवला आहे.
तर दुसरीकडे उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती असण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही उष्णता वाढण्याचा अंदाज असून पुढील २४ तासांत मुंबई व उपनगरातील हवामान कोरडं राहणार असून, आकाश मुख्यत: निरभ्र राहील. या काळात शहराचं तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील उष्णतेची लाट आहे.