भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

….नाहीतर तुमचं रेशन कार्ड रद्द होणार, नवे नियम सरकारकडून जारी

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। केंद्र सरकारकडून लाखो रेशन कार्डधारकांना मोफत रेशन दिलं जातं. सरकारने या वर्षीही म्हणजे २०२३ मध्येही रेशन कार्डधारकांना मोफत रेशन देण्यात येणार असल्याचं सरकारने जाहीर केलं होतं. मात्र, अपात्र लोकही मोफत रेशनचा फायदा घेत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात येत आहे. जे लोक अपात्र आहेत आणि तरीही मोफत रेशन घेत आहेत, अशा लोकांनी स्वत: आपलं रेशन कार्ड रद्द करावं असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. जर लोकांनी स्वत:हून रेशन कार्ड रद्द नाही केलं तर त्याची सत्यता तपासल्यानंतर अन्न पुरवठा विभागाची टीम रेशन कार्ड रद्द करणार आहे. अशा लोकांविरोधात कारवाईही केली जाऊ शकते.

जर रेशन कार्डधारकाने स्वत:च्या उत्पन्नातून १०० वर्गमीटरचा प्लॉट, फ्लॅट किंवा घर खरेदी केली असेल, त्याच्याकडे चार चाकी गाडी, शस्त्राचं लायसन्स असेल, गावात वर्षाला दोन लाख आणि शहरात तीन लाखाहून अधिक पगार असेल अशा लोकांना त्यांचं रेशन कार्ड तहसील किंवा डीएसओ कार्यालयात सरेंडर करावं लागणार आहे. या चार गोष्टींपैकी एका जरी गोष्टीत दोषी आढळल्यास रेशन कार्डधारकाचे रेशन कार्ड तर रद्द होईलच पण त्याच्यावर कारवाईही केली जाणार आहे.

नव्या सरकारी नियमानुसार जर रेशन कार्डधारकाने स्वत:हून कार्ड सरेंडर केलं नाही तर चौकशीनंतर त्याचं कार्ड रद्द केलं जाईल. तसेच त्याच्या कुटुंबीयांविरोधात कायदेशीर कारवाईही होऊ शकते. एवढेच नाही तर जेव्हापासून हे लोक रेशन घेत आहेत, तेव्हापासूनची त्यांच्याकडून भरपाईही केली जाणार आहे. केंद्र सरकारने अत्यंत कडक नियम केले आहेत. त्यामुळे रेशन कार्डधारकांनी या नियमांचं पालन केलं पाहिजे. ज्यांची आर्थिक क्षमता आहे. त्यांनी मोफतमध्ये रेशन घेऊ नये. रेशनिंग व्यवस्था ही गोरगरीबांसाठी आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांनी रेशन कार्ड रद्द केलं तर त्याचा फायदा इतर गरीबांना होणार आहे, असं सांगितलं जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!