भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

दारुच्या नशेत बापानं केलं काही भलतचं…,पोटच्या मुलावरच…..

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l व्यसनामुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त होतं असतात. त्यातून अनेक गंभीर गुन्हे होत असतात.गंभीर गुन्ह्यांमागे व्यसन, मद्यपान ही देखील कारणं असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. मुंबईतील सांताक्रूझमध्ये याच कारणावरून एक गंभीर गुन्हा घडला आहे. एका व्यक्तीनं दारुच्या नशेत स्वतःच्या मुलाची चाकूने वार करत निर्घृण हत्या केली आहे.

दिनेश कुमार गुप्ता याने स्वतच्या आलोक या १७ वर्षाच्या मुलाची चाकूने वार करून हत्या केली. दिनेश कुमार याला दारुचं व्यसन होतं, दारुच्या नशेत त्याने स्वतःच्या मुलावरच चाकूने वार करत हत्या केल्याचा आरोप आहे. त्याला वाकोला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. गुप्ता हा मूळचा उत्तर प्रदेशातला असून तो दोन मुलं आणि पत्नीसह वाकोला परिसरात राहत होता.

वाकोला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी दिनेश मद्यपान करून घरी आला. त्यावेळी त्याचा आलोकशी वाद झाला. मद्यपान हे वादाचं कारण होतं. या दोघांमध्ये बराच वेळ वाद सुरू राहिला. आलोक त्याच्या वडिलांना दारू पिण्यास मनाई करत होता. आलोकच्या विरोधामुळे संतापलेल्या दिनेशने किचनमधील चाकूने आलोकवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात आलोक गंभीर जखमी झाला. त्याचा आवाज ऐकून घराच्या बाहेर थोड्या अंतरावर बसलेली त्याची बहीण प्रीती आणि शेजारील व्यक्ती धावत दिनेशच्या घरी आले. आलोकला लोकांनी तातडीने व्ही.एन. देसाई रुग्णालयात नेलं. पण तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच वाकोला पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दिनेशला अटक केली. तसेच घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त केला. प्रीतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिनेश कुमार विरुद्ध गुन्हा दाखल केला. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!