भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

पुन्हा आज राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात 85 पैशांनी वाढ

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यासह देशात इंधनाच्या किमतीत दरवाढ होत असताना 22 मार्चपासून पेट्रोल डिझेलच्या दरवाढीची मालिका सुरूच आहे. तेव्हा पासून आजपर्यंत इंधनाच्या किमतीत प्रति लिटर मागे तब्बल 9 रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली.

राज्यात आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रति लिटर मागे 85 पैशांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार आज मुंबईमध्ये पेट्रोचा दर प्रति लिटर 120.51 तर डिझेल प्रति लिटर 104.77 रुपयांवर पोहेचला आहे. नागपूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 119.33 तर डिझेल 102.65 रुपये. नाशिक-पेट्रोल 119.11 तर डिझेल 101.83 रुपये, तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 119.97 रुपये तर डिझेल प्रति लिटर 102.65 रुपयांवर पोहोचले, पुण्यात पेट्रोलचे दर प्रति लिटर 119.07 रुपये तर डिझेलचे दर प्रति लिटर 102.67 रुपयांवर पोहोचले आहेत.

दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 80 पैशांनी महागले, नव्या दरानुसार आज दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेल प्रति लिटर 96.67 रुपये,चेन्नईमध्ये पेट्रोल 110.11 रुपये तर डिझेल 100.19 रुपये, कोलकातामध्ये पेट्रोल 114.28 रुपये लिटर झाले, इंधनाच्या वाढत्या किमती बाबत, केवळ भारतातच नाही तर जगभरात इंधनाच्या किमती वाढत आहेत. त्यामानाने भारतात कमी भाववाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात अमेरिकेत पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये 55 टक्क्यांची वाढ झाली आहे. जर्मनीमध्ये 54 टक्के व कॅनडामध्ये इंधनाच्या किमतीमध्ये 51 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्या मानाने भारतात आतापर्यंत केवळ पाच टक्के इतकीच वाढ करण्यात आली असल्याचे पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!