भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्र

पेट्रोल-डिझेल स्वस्त, क्रूड ऑईलच्या किंमतीत घसरण

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्रात पेट्रोलमध्ये 57 पैशांची घसरण झाली. आजचा पेट्रोलचा भाव 105.96 रुपये प्रति लिटर झाला. तर डिझेल 54 पैशांनी स्वस्त झाले. डिझेल 92.49 रुपये प्रति लिटरवर पोहचले. मध्यप्रदेशात पेट्रोल 30 पैशांची स्वस्त झाले. या राज्यात भाव 109.70 रुपये प्रति लिटर झाले. तर डिझेल 28 पैशांनी घसरले. डिझेलची विक्री 94.89 रुपये प्रति लिटरने होत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमतीत घसरण सुरु आहे. त्याचा मोठा परिणाम भारतीय बाजारात दिसून आला नाही. पण काही राज्यात दरात नगण्य फरक पडला आहे. काही दिवसांपूर्वी कच्चे तेल 100 डॉलर प्रत‍ि बॅरलवर पोहचले होते. त्यानंतर किंमती आता जवळपास 80 डॉलर प्रति बॅरलवर येऊन पोहचल्या आहेत. अर्थात तेल विपणन कंपन्यांचा अजब दावा आहे. त्यांच्या मते, गेल्या सात महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या भावात कुठलीही दरवाढ करण्यात आली नाही. कंपन्यांना मध्यंतरी जादा दराने क्रूड ऑईल खरेदी करावे लागले होते. त्याचा तोटा अद्यापही भरुन निघालेला नाही.

गुरुवारी सकाळी ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीत 0.60 डॉलरची घसरण झाली. सध्या त्याचा भाव 84.38 डॉलर प्रति बॅरल आहे. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईल 0.76 डॉलर घसरुन 78.72 डॉलर प्रति बॅरलवर
पोहचले आहे. दोन दिवसांपूर्वी कच्चे तेल महागले होते. किंमती 100 डॉलर प्रत‍ि बॅरलवर पोहचल्या होत्या.

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर पोहचले. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर, चेन्नईत पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर तर कोलकत्तामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटरवर पोहचले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!