भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्र

पेट्रोल, डिझेल मध्ये पुन्हा दरवाढ? कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत.असे असतानाही आज देशातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत असलेले कच्च्या तेलाचे भाव पहाता भारतात लवकरच पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल 122 डॉलरवर पोहोचले आहेत. येत्या काळात त्यामध्ये आणखी वाढ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि काही युरोपीयन राष्ट्रांकडून रशियाकडून करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ पहायला मिळत आहे. रशियाकडून भारताला सवलतीच्या दरात तेल मिळत होते, मात्र लवकरच रशियाकडून ही सवलत बंद होणार आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याने ग्राहकांच्या खिशाला चाट बसणार असल्याचे दिसते.

कर कपातीमुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले असतानाही गेल्या महिन्यात केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या अबकारी करात कपात करण्यात आली होती. अबकारी करात कपात करण्यात आल्यामुळे पेट्रोल प्रति लिटर साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे. तेव्हापासून इंधनाच्या दरात कोणताही बदल झाला नसून, पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!