पेट्रोल-डिझेल दरवाढीची मालिका सुरूच ,14 दिवसात 12 वेळा दरवाढ,आतापर्यंत 8.40 रुपये वाढले
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरील नियंत्रण हटवल्यानंतर देशातील ऑईल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले जातात. ऑईल कंपन्या रोज सकाळी दरवाढ जाहीर करतात. देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांमुळं ही प्रक्रिया थांबली होती. आता निवडणुका संपल्यानंतर दरवाढीचा शॉक सर्वसामान्यांना बसत आहे. गेल्या 14 दिवसांमध्ये तब्बल 12 वेळा इंधनदरवाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत 8 रुपये 40 पैशांनी डिझेल आणि पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत. दुसरीकडे वाढत्या महागाईवरुन विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतलीय. तर, उबरनं देखील त्यांच्या सेवेत दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई पेट्रोल 118.81 रुपये तर डिझेल 103.04 रुपयांना विकलं जातंय. तर, पुणे शहारत 118.29 रुपयांवर पोहोचलंय. तर डिझेल 101.01 रुपयांवर पोहोचलंय.
आर्थिक राजधानी मुंबईतील पेट्रोलचा दर 118.81 रुपये तर डिझेलचा दर 103.04 पैशांवर पोहोचला आहे. आज लीटरमागे 40 पैशांची वाढ झाली आहे.
पुण्यात पेट्रोलचे दर देखील वाढले आहेत. पेट्रोलचे दर 118.29 रुपयांवर पोहोचले आहेत. तर पॉवर पेट्रोलचे दर 122.79 रुपयांना विकलं जातंय. डिझेलचे पुण्यातील दर 101.01 वर पोहोचले आहेत. तर,सीएनजी गॅसची किंमत 62.20 रुपयांवर पोहोचले आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 103.81 रुपयांवर पोहोचला आहे. तर, डिझेलचा दर 95.07 रुपयांवर पोहोचलाय.
22 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत 14 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 12 वेळा वाढ करण्यात आलीय. दरम्यान, 24 मार्च आणि 1 एप्रिल रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नव्हता, त्यामुळं देशभरातील किमती स्थिर होत्या. बहुतांश दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ झालीय.
कोणत्या तारखेला किती रुपयांनी वाढलं
22 मार्च 80 पैसे
23 मार्च 80 पैसे
25 मार्च 80 पैसे
26 मार्च 80 पैसे
27 मार्च 50 पैसे
28 मार्च 30 पैसे
29 मार्च 80 पैसे
30 मार्च 80 पैसे
31 मार्च 80 पैसे
2 एप्रिल 80 पैसे
3 एप्रिल 80 पैसे
4 एप्रिल 40 पैसे