भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, सर्वसामान्यांना फटका

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. परिणामी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीचा फटका सर्वसामान्यांना सोसावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांनाच त्रास सहन करावा लागत आहे असे नाही, तर शेतकऱ्यांनाही मोठा फटका सहन करावा लागत आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामुळे शेतात मशागती करण्यासाठी त्यांना अधिकची रक्कम मोजावी लागत आहे. दरम्यान आज महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये इंधनाचे दर वाढले आहेत. चला तर मग जाणून घेऊया 1 लिटर पेट्रोल-डिझेल किती पैशांनी महागले आहेत.

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढ
महाराष्ट्रातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोलचा दर 84 पैशांनी वाढून 106.98 रुपये प्रति लिटर झाला आहे. डिझेलचा दर 85 पैशांनी वाढून 93.54 प्रतिलिटर झाला आहे. तर मुंबई शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपयांनी तर डिझेलचा दर 94.27रुपयांनी वाढला आहे. तसेच, पुणे जिल्ह्यात पेट्रोल प्रतिलिटर 106.21 रूपये तर डिझेल 92.53 रूपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल 108.07 रुपये आणि डिझेल 93.55 रुपये आहे.

सर्व राज्यांचे पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला…
देशातील सर्वच राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. सर्वच राज्यातील नागरिकांना प्रति लिटर पेट्रोलसाठी जास्त रक्कम मोजावी लागते. तर देशातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत विकले जाते. आज वाढलेल्या दरानंतर परभणीत पेट्रोलचा प्रतिलिटर दर 109.47 रुपये आहे. डिझेलची किंमत 95.86 रुपये प्रति लिटर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर जवळपास स्थिर राहिले. WTI क्रूड $ 0.01 ने वाढून प्रति बॅरल $ 69.38 वर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड $ 0.03 नी घसरून प्रति बॅरल $ 74.15 वर व्यापार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले असून भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाच्या किमती सुधारल्या जातात. त्यानुसार राजस्थानमध्ये 51 पैशांच्या घसरणीसह पेट्रोल 108.07 प्रति लिटर विकले जात आहे. त्याचवेळी डिझेल 93.35 लिटर 46 पैशांनी स्वस्त होत आहे. तर गुजरातमध्ये पेट्रोल-डिझेल 14 पैसे स्वस्त विकले जात आहे. हरियाणामध्ये पेट्रोल आणि डिझेल 18 पैशांनी स्वस्त झाले आहे. दुसरीकडे हिमाचलमध्ये पेट्रोल 34 पैशांनी तर डिझेल 31 पैशांनी महागलं आहे. याशिवाय महाराष्ट्र, छत्तीसगड आणि केरळसह अनेक राज्यांमध्ये इंधनाच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!