पेट्रोल – डिझेलच्या किमतीत वाढ,काय आहेत आजचे दर
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आता तुमच्या खिशाला अधिक कात्री लागणार आहे. कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्याने पेट्रोल डिझेलच्या दरात बदल झाले आहेत. उत्तर भारतातच नाही तर महाराष्ट्रात देखील पेट्रोल डिझेलचे दर बदलले आहेत. त्यामुळे तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत आज वाढ झाली. त्याचा परिणाम असा झाला की पेट्रोल डिझेल कंपन्यांनी दर वाढवले आहेत. सोमवारी सकाळी 6 च्या सुमारास, WTI कच्चे तेल प्रति बॅरल $ 71.36 वर विकले जात आहे. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 76.03 डॉलरपर्यंत घसरले आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत.
महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरात 36 पैशांनी तर डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ होत आहे. मध्य प्रदेशात पेट्रोल 25 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी महागलं आहे. यासोबतच झारखंड, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
बिहारमध्ये पेट्रोल 36 पैशांनी तर डिझेल 34 पैशांनी स्वस्त झालं आहे. पंजाबमध्ये कालच्या तुलनेत पेट्रोल 27 पैशांनी तर डिझेल 29 पैशांनी स्वस्त होत आहे. छत्तीसगडमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे.